विदर्भ

भाजी, फळ वक्रेते यांची आरोग्य तपासणी.!

Advertisements

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

चेकपोस्ट वर 10 आरोग्य पथकांमार्फत तपासणी

वर्धा, दि. 5 :- भाजी आणि फळ विक्रेते यांचा जास्त लोकांशी संपर्क येतो. त्यामुळे पुढे कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्व भूमीवर खबरदारी म्हणून भाजी आणि फळ विक्रेते यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात 21 टीम तयार करण्यात आल्या आहे. शिवाय बाहेर जिल्ह्यातून भाजी आणि फळ घेऊन येणाऱयांची चेकपोस्टवरच 10 पथकांमार्फत तपासणी करण्यात येत आहे अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.
जिल्ह्यात आतापर्यंत एकही व्यक्ती कोरोनाबाधित आढळली नसली तरी जिल्हाब प्रशासन अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे. निवारागृहात व्यवस्था करण्यात आलेल्या कामगारांची आरोग्य तपासणीनंतर आता आरोग्य विभागाने भाजी व फळ विक्रेत्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांनी 31 आरोग्य तपासणी पथक तयार केले आहेत. यातील 10 पथक जिल्ह्याच्या 10 चेक पोस्टवर ठेवण्यात आले आहेत. यामध्ये डाक्टर, आरोग्य सेवक, नर्स अशा एकूण 95 लोकांचा सहभाग आहे.

वर्धा जिल्ह्यात अमरावती येथून भाजी आणि फळे येतात. त्यामुळे पुलगाव 2, आष्टी- 4 आर्वी- 1 नागपूर-2 आणि हिंगणघाट 1 अशा 10 चेक पोस्टवर सकाळी 5 वाजता पासून आरोग्य पथकाने बाहेर जिल्ह्यातून जीवणावश्यक वस्तू घेऊन येणारे वाहतूकदार आणि भाजी उत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांची आज आरोग्य तपासणी केली.

तसेच उर्वरित 21 पथकाने जिल्ह्यातील सर्व 8 तालुक्यातील ग्रामीण भागातील आठवडी बाजार, आणि 10 नगर परिषद मधील भाजी बाजार, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजी आणणारे शेतकरी व ठोक भाजी विक्रेते यांची आरोग्य तपासणी केली .

वर्धेत आंबेडकर चौक आणि स्वावलंबी मैदान येथील भाजी व फळ विक्रेत्यांची जागेवरच तपासणी करण्यात आली. यामध्ये एखाद्याला सर्दी , खोकला किंवा ताप अशी लक्षणे आढळल्यास त्यांना वेगळे काढून तात्काळ औषधोपचार करण्यात आला आहे. ही तपासणी पुढेही सुरू राहील तसेच उद्या सर्व किराणा दुकानदारांची सुद्धा आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे.

You may also like

विदर्भ

यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांची तक्रार आरोग्य विभागाने केली ,  “उलट जिल्हातीलचं जनता जिल्हाधिकारी साहेबांच्या मदतीला धावुन आली….!”

कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी का झाले आरोग्य विभागाला डोईजड ?? नरेन्द्र कोवे यवतमाळ – जगभरात करोना विषाणूजन्य ...

कोरपणा येथे युवा प्रतिष्ठान द्वारा संचालीत युवा फिटनेस कल्ब चा लोकार्पण सोहळा संपन्न

कोरपना प्रतिनिधी मनोज गोरे कोरपणा येथे मागील वर्षा पासुन युवकांच्या समस्या सोडण्यासाठी समाजसेवेचे कार्य करण्याकरीता ...
विदर्भ

यवतमाळ जिल्हातील पारवा ठाणेदाराकडून आदिवासी इसमाला जातीवाचक शिवा देत मारहाण

ठाणेदाऱ्यांच्या विरुद्ध जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल यवतमाळ / घाटंजी – तालुक्यातील पारवा पोलीस ...
विदर्भ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसेने स्विकारली सर्व अंत्यसंस्काराची जबाबदारी…..

कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांना अंत्यसंस्कार करण्यासाठी मोफत पी पी ई किट….मनसे समाजातील सरसावली आर्थिक दुर्बल घटकांसाठी ...
विदर्भ

पुसद येथे अल्पसंख्यांक विद्यार्थ्यां करिता पोलिस भर्ती पूर्व प्रशिक्षण विशेष कार्यशाळा संपन्न

यवतमाळ / पुसद –  राज्यात अल्पसंख्याक समाजाचे पोलिस सेवेतील प्रमाण वाढावे याकरीता पुसद जिल्हा यवतमाळ ...
विदर्भ

आलेगाव येथे प्राण्यांवर लम्पी रोगाचा प्रकोप , “लस सह डॉक्टर उपलब्ध नाही”

अकोला – पातुर तालुक्यातील आलेगाव येथे प्राण्यांवर लम्पी आजाराचा प्रकोप वाढला असून आलेगाव पशु रुग्णालयात ...