Home जळगाव शिवसेना व युवा सेनेतर्फे गोर – गरिबांना मोफत जेवण वाटप

शिवसेना व युवा सेनेतर्फे गोर – गरिबांना मोफत जेवण वाटप

106
0

निखिल मोर

पाचोरा – जगभरासह भारतात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. महाराष्ट्रातही संक्रमित रुग्ण आढळुन येत असल्याने संपूर्ण देशासह महाराष्ट्र ही लाॅकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे गोर गरिब, हात मजुरी करणारे हताश होवुन त्यांचेवर उपासमारीची वेळ येवुन ठेपलेली आहे. मतदार संघात कोणीही गोर – गरिब, हात मजुरी करणारे उपाशी राहु नये याकरिता पाचोरा – भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांचे संकल्पनेतुन शिवसेना, युवासेना तर्फे पाचोरा व भडगाव मतदार संघात रोज सकाळ व संध्याकाळ ४ ते ५ हजार गरीब – गरजू कुटूंबियांना जेवणाची व्यवस्था करित आहे. याकामी उद्योजक मुकुंद बिल्दिकर, शिवसेना जिल्हा उपप्रमुख गणेश पाटील, भरत खंडेलवाल, संतोष गौड, सुनील गौड, शरद पाटील, सुमित सावंत सह पाचोरा व भडगाव तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने परिश्रम घेत आहेत.