Home विदर्भ अन देउळगावमही येथील युवकांनीच केले गाव लोकडाऊन ,

अन देउळगावमही येथील युवकांनीच केले गाव लोकडाऊन ,

193
0

गावचे मुख्य रस्ते बंद ,

प्रतिनिधी-( रवि आण्णा जाधव )

देऊळगाव मही:- बुलढाणात सामन्य रुग्णालयात एका ४५ वर्षीय इसमाचा कोरोना आजाराने मुत्यू झाला आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या २५ ते ३० लोकांपैकी चार जण संशयित असल्याची खळबळ जिल्हाभर उडाली या कोरोनाच्या संसर्क टाळण्यासाठी देऊळगाव मही येथील युवकांनी गावाला स्वतःहुन लॉकडाऊन राहण्याचा संकल्प घेतला.
देऊळगाव मही गावाची लोकसंख्या 12 हजाराच्या जवळपास आहे देऊळगाव मही हे गाव देऊळगाव मही पोलीस चौकी अंतर्गत असून आकिल काजी साहेब हे काम पाहतात.मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोना आजाराने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यातच तीन ते चार दिवसपूर्वी बुलढाणा सामान्य रुग्णालयात एका ४५वर्षीय इसमाचा कोरोनच्या आजाराने मुत्यु झाला आणि त्यांचा संपर्कात आल्याची बातमी सर्वत्र पसरली या भीतीपोटी शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोनाच्या धास्तीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.