Home महत्वाची बातमी पोलीस कर्मचार्‍यांची थर्मल स्कॅनर मशिनद्वारे तपासणी,

पोलीस कर्मचार्‍यांची थर्मल स्कॅनर मशिनद्वारे तपासणी,

167

जीवन महाजन

नंदुरबार (प्रतिनिधी)- कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस विभागानेही अधिकारी व कर्मचार्‍यांची काळजी घेत उपाययोजना राबविल्या आहेत. पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी थर्मल स्कॅनर मशिनद्वारे शारीरिक तापमान मोजण्यात आले. तसेच पोलीस दलातील वाहनांची स्वच्छता व निर्जंतुकीकरणासाठी फवारणी यंत्र पोलीस ठाण्यांना वाटप करण्यात आले.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असतांना पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांना कारदा व सुव्रवस्था राखण्रासाठी कर्तव्य बजवावे लागते. म्हणून पोलीसांच्या आरोग्राची काळजी घेणेही तेवढेच महत्वाचे आहे. त्रासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी उपाययोजनेतुन एक पाऊल पुढे टाकले आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे, उपविभागीय कार्रालर, सर्व शाखेतील कर्मचार्‍यांची शारीरीक तापमान मोजणी थर्मल स्कॅनर मशिनद्वारे करण्यासाठी प्रत्येकी एक मशिन देण्यात आले. नंदुरबार, शहादा व अक्कलकुवा या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयांना पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांच्या हस्ते मशिन वाटप करण्यात आले. मशिन वापरण्याचे प्रात्याक्षिक जिल्हा रुग्णालरातील रेथील वैद्यकिर अधिकारी चौधरी रांनी दिले. तसेच जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक कार्रालरासह परिसर व जिल्ह्यातील पोलीस ठाण्रातील सर्व चारचाकी वाहनांची स्वच्छता व निर्जंतुकीकरणासाठी 15 फवारणी रंत्रांची खरेदी करुन प्रत्येक पोलीस ठाण्रातील एका कर्मचार्‍याला प्रशिक्षण देवुन यंत्र वाटप करण्रात आले.