महत्वाची बातमी

परराज्यातुन आलेल्या ऊसतोड 150 मजुरांची रनाळ्यात तपासणी

Advertisements

जीवन महाजन

रनाळे (प्रतिनिधी)- कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने ऊसतोडीसाठी परराज्यात गेलेले मजुर आपल्या गावी परतु लागले आहेत. नंदुरबार तालुक्यातील रनाळेसह परिसरात सुमारे 150 हुन अधिक मजुर कुटूंबिय गावी परतल्याने दक्षता म्हणुन या मजुरांची रूग्णालयात तपासणी करण्यात आली.
नंदुरबार तालुक्यातील रनाळे व ढंढाणे परिसरातील मजुर कुटूंबिय रोजगारानिमित्त ऊसतोडीसाठी परराज्यात गेले होते. परंतु सध्या जगभरात कोरोना विषाणुने थैमान घातले असल्याने देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे सर्वच व्यवहार बंद झाले असल्याने परराज्यात ऊसतोड करणारे मजुर आपापल्या गावी परतु लागले आहेत. रनाळेसह ढंढाणे परिसरातील सुमारे 150 हुन अधिक मजुर परराज्यातुन आले आहेत. गावात पोहोचण्यापूर्वीच मनोहर हारु भिल यांच्यासह अन्य मजुरांनी शिवसेनेचे माजी सहसंपर्क प्रमुख दिपक गवते यांच्याशी संपर्क साधला. यावेळी गवते व मजुरांची चर्चा झाल्याने रनाळे येथील ग्रामीण रूग्णालयात मजुरांना तपासणीसाठी येण्याचे सांगण्यात आले. त्यानुसार परराज्यातुन आलेले मजुर कुटूंबियांची रनाळे ग्रामीण रूग्णालयात तपासणी करुन त्यांना पुढील 15 दिवस घरातच राहण्याचे आवाहन शिवसेनेचे दिपक गवते यांनी केले आहे. तसेच संचारबंदीमुळे गावात विनाकारण फिरणार्‍यांनी कायद्याचे पालन करुन घरात राहण्याचे आवाहन केले.

You may also like

महत्वाची बातमी

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने कोर्टात ताबडतोब पुनर्विचार याचिका दाखल करावी

  रावेर (शरीफ शेख) रॅगिंग विरोधी समितीच्या शिफारशी नुसार संबंधित आरोपींवर निलंबनाची कारवाई न करणाऱ्या ...
महत्वाची बातमी

जिल्हा उपनिबंधक श्री कुंदन भोळे यांनी तात्काळ घेतली “पत्रकार संरक्षण समिती” च्या तक्रारीची दखल

सोलापूर  – सोलापूर येथील सोलापूर सिध्देश्वर बँकेच्या मुख्य वसुली अधिकारीने दै . अब तक सोलापूरचे ...