Home विदर्भ “कोरोना” , पालकमंत्र्यांनी दिला 50 लाखांचा आमदार निधी…!

“कोरोना” , पालकमंत्र्यांनी दिला 50 लाखांचा आमदार निधी…!

66
0

वैद्यकीय यंत्रसामुग्रीकरीता इतरही आमदारांनी निधी देण्याचे आवाहन….!

यवतमाळ , दि. 3 : – कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात अत्यावश्यक यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीकरीता राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत 50 लक्ष रुपयांचा निधी दिला आहे. जिल्हाधिका-यांना पाठविलेल्या पत्रात पालकमंत्री श्री. राठोड यांनी रुग्णालयांमध्ये आयसीयु व्हेंटिलेटर, विलगीकरण कक्ष तयार करणे तसेच वैद्यकीय यंत्रसामुग्री खरेदी करण्याकरीता करावा, हा निधी मंजूर करावा, असे म्हटले आहेत.
‘महाराष्ट्र कोव्हिड – 19’ उपाययोजनेंतर्गत जिल्हा पातळीवर करण्यात येत असलेल्या कार्यवाहीला बळ देण्यासाठी एक वेगळी विशेष बाब म्हणून ‘आमदार स्थानिक विकास कार्यक्रम 2019-20 व 2020-21’ अंतर्गत वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य तात्काळ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इतरही आमदारांनीसुध्दा आपला निधी या कामाकरीता द्यावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे.