Home विदर्भ लॉक डाऊन’ मध्ये गरजूंना मदत पुरविण्याकरिता परवानगी द्यावी – मो.युसूफ पुंजानी

लॉक डाऊन’ मध्ये गरजूंना मदत पुरविण्याकरिता परवानगी द्यावी – मो.युसूफ पुंजानी

211
0

आरिफ पोपटे

प्रतिनिधी । कारंजा (लाड)

कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या प्रादुर्भावास व प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ लागू करण्यात आला असून संपुर्ण देशामध्ये लॉक डाऊन करण्यात आले आहे.या लॉक डाऊन काळात गरजूंना अन्न-धान्य वाटप करण्याची मागणी मो.युसूफ पुंजानी यांनी जिल्हाधिकारी वाशिम यांना निवेदन देऊन केली आहे.

निवेदनामध्ये नमूद केले आहे की, कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या प्रादुर्भावास व प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ लागू करण्यात आला असून संपुर्ण देशामध्ये लॉक डाऊन करण्यात आले आहे.मात्र या ‘लॉक डाऊन’ मुळे दैनंदिन रोजंदारी वर आलेल्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यांना मदत करण्याकरिता आम्ही सक्षम असून या नागरिकांना अन्न-धान्य पुरविण्याचा आम्ही निर्धार केला आहे.तसेच या महिन्यामध्ये सरकारी रास्त दुकानात रास्त भाव मिळण्याच्या राशनाचे पैसे सुद्धा आमच्या मार्फत देण्याची आमची इच्छा आहे. यामुळे या संकटकाळात या गरजूंना मदत होईल व कोणावरही उपासमारीची वेळ येऊ नये ह्या उद्देशाने ते हे कार्य करणार असल्याचे पुंजानी यांनी नमूद आहे.

फोटो-