महाराष्ट्र

जमाते इस्लामी हिंद यांनी २६७५ कुटुंबांना वाटप केले रेशनचे किट

(प्रतिनिधी लियाकत शाह)
जमाते इस्लामी हिंद यांनी औरंगाबाद शहरात १२ लाख ७५ हजार रुपयाचे वाटप केले अन्नधान्य नैसर्गिक आपत्ती असो किंवा देशावर आलेले संकट नेहमी जमातचा असतो खारीचा वाटा औरंगाबाद, नैसर्गिक आपत्ती असो किंवा देशावर आलेले कोणत्याही संकटात नेहमी देशवासीयांना मदत करण्यासाठी जमाते इस्लामी हिंदचा खारीचा वाटा असतो. देशात कोठे दंगल झाली त्यामध्ये दंगलग्रस्तांना, पूरग्रस्तांना नेहमी पिडीतांना आपल्या परिने मदत करुन दिलासा देण्याचा प्रयत्न जमातचा असतो. मानवतेसाठी मागील अनेक वर्षांपासून जमाते इस्लामी हिंद भारत देशात काम करत आहे. यावेळी कोरोनाचे संकट देशावर ओढवले असताना १४ एप्रिल पर्यंत केंद्र सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला अशावेळी सर्व व्यापार धंदे, मोलमजुरी बंद असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी जमात पुढे आली. मस्जिद बंद करुन घरीच नमाज अदा करु शकतात असा समाजात आत्मविश्वास निर्माण केला. गरजूंना व त्याच्या कुटुंबावर भुकेले राहण्याची वेळ येवू नये यासाठी शहरात २६७५ कुटुंबांना शासनाची परवानगी घेवून घरपोच रेशनचे व किराणा सामानचे किट सोशल डिस्टन्स ठेवत वाटप करण्यात आले. प्रसिध्दीसाठी जमात काम करत नाही त्यांनी कधी किट वाटप करताना छायाचित्रे काढली नाही तर मानवतेसाठी काम करत सर्व जाती धर्मातील गरजूंना किटचे वाटप केले. एकूण १२ लाख ७५ हजार रुपयांचे अन्नधान्य औरंगाबाद शहरात वाटप करण्यात आले आहे शहराध्यक्ष इंजि. वाजेद कादरी यांनी दिली आहे. त्यांनी सांगितले २३ मार्च ते २ एप्रिल पर्यंत २६७५ रेशनचे कीट वाटप झाले आहे अजून हे काम १४ एप्रिल पर्यंत निरंतर सुरुच राहणार आहेत.

0 Reviews

Write a Review

Advertisements
Advertisements

You may also like

महाराष्ट्र

कळंब कोविड केअर सेंटरमध्ये सुविधा उपलब्ध करून द्या कळंब तालुका भाजपची मागणी

सलमान मुल्ला कळंब , उस्मानाबाद याबाबत सविस्तर माहिती अशी की मार्च 2020 पासून महाराष्ट्र मध्ये ...

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्र

लहान भाऊ च्या मृत्यू ची बातमी ऐकताच मोठ्या भावाचाही झाला मृत्यू ,

, अमीन शाह , चीपळून  – लहान भावाच्या मृत्यूच्या दु:खामुळे मोठ्या भावानेही जीव सोडल्याची घटना चिपळूणमध्ये ...
महाराष्ट्र

कळंब नगराध्यक्षाच्या पतीसह उपनगराध्यक्ष यांना कोरोना*

*प्रतिनिधी:-सलमान मुल्ला* याबाबत सविस्तर माहिती अशी की उस्मानाबाद जिल्ह्यासह कळंब तालुक्यातील वाढते करण्याचे प्रमाण गेल्या ...
महाराष्ट्र

*राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदी श्रीधर भवर*

*प्रतिनिधी:-सलमान मुल्ला* गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी ...