Home मराठवाडा मुख्यमंत्री सहाय्यता निधीला विद्यार्थ्यांनी दिले खाऊचे पैसे

मुख्यमंत्री सहाय्यता निधीला विद्यार्थ्यांनी दिले खाऊचे पैसे

65
0

मजहर शेख

नांदेड / माहूर , दि. ०१:- कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करण्यासाठी व सरकारला आर्थिक मदत देण्यासाठी हजारो हात पुढे येत आहे.असाच एक खारीचा वाटा माहूर येथील विद्यार्थ्यांनी उचललाय.सैफ व कैफ दो या चिमकल्यानी आपल्या खाऊचे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी माहूर येथील तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांच्याकडे सुपूर्द केले आहे.

जीनियस किड्स इंटरनॅशनल स्कूल माहूरचे विद्यार्थी सैफ फिरोज दोसानी,व कैफ सरफराज दोसानी या दोन चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळणारे खाऊचे पैसे खर्च न करता ते पैसे आपल्या पिग्गी बँक मध्ये जमवले. वर्ष भराची जमवलेली रक्कम दोघा भावंडांनी आज दिनाक ०१ बुधवार रोजी तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांच्या कडे सुपूर्द केली.

तहसीलदारांनी केले बालगोपालांचे अभिनंदन

माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक फिरोज दोसाणी,पत्रकार सरफराज दोसाणी या दोघा भावांच्या समाज सेवेचा वसा पुढे नेत सैफ आणि कैफ या दोन्ही भावांनी जो गोवर्धन पर्वत उचलला आहे ते अभिनंदनीय आहे. कोरोनाचा नायनाट व्हावा ही अंतरिम इच्छा या चुमकल्यांची आहे.ती नक्कीच लवकरच पूर्ण होईल.समाजातील सर्व घटकांनी या उपक्रमाचा आदर्श घेत खारीचा वाटा उचलावा असे आवाहन तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी केले आहे.

Unlimited Reseller Hosting