Home सोलापुर अप्पर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांची वागदरीत पहाणी.

अप्पर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांची वागदरीत पहाणी.

72
0

वागदरी / नागप्पा आष्टगी

अक्कलकोट तालुक्यातील वागदरी परमेश्वर यात्रा घेण्यास मनाई असतानादेखील झालेल्या घटनेबध्दल माहिती घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी पहाणी करून आढावा घेतला.
यावेळी अक्कलकोट तहसीलदार अंजली मरोड, अक्कलकोट डिवाय एस पी डा. संतोष गायकवाड, उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कल्लप्पा पुजारी यांनी भेट देऊन ग्रामपंचायत सरपंच यांना आवश्यक त्या सूचना दिले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक व तहसीलदारांनी श्री परमेश्वर मंदिर परिसर , ग्रामपंचायत परिसर, प्राथमिक आरोग्य केंद्र व कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर वर भेट देऊन पाहणी केली. ह्यावेळेस संबंधित अधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक पुजारी व मा .सरपंच विजयकुमार ढोपरे यांना गावात शांतता प्रस्थापित करण्याचे सूचना दिल्या आहेत.. यावेळी नायब तहसीलदार दत्ता गायकवाड, संतोष कांबळे, एपीआय निलेश तारू, अक्कलकोट पोलीस ठाण्याचे ,अजय भोसले, अरुण राऊत,नागरिक तंटामुक्त समिती अध्यक्ष राजकुमार यादव, आदी उपस्थित होते.