Home विदर्भ वर्धा जिल्हातील येरला ग्रामपंचायतचे नियम धाब्यावर ठेवून जमावबंदीचे उल्लंघन

वर्धा जिल्हातील येरला ग्रामपंचायतचे नियम धाब्यावर ठेवून जमावबंदीचे उल्लंघन

99

वर्धा / वडनेर :- स्थानीय हिंगणघाट तालुक्यातील येरला ग्राम पंचायत च्या प्रशासकीय इमारती मध्ये दि .28/03/2020 ला ग्राम पंचायत मधे जास्त लोक एकत्रित करून प्रेमयुगाचे लग्न लाऊन देण्याचा सर्वत्र जमावबंदी असताना हा प्रकार घडला .

त्यावेळी स्थानीय पत्रकार श्री . प्रमोद झीले यानी तो प्रकार पाहून जमावबंदी चे येरला ग्राम पंचायत कडून नियम धाब्यावर अशी बातमी टाकली असता येथील युवक मयूर झीले यानी पत्रकार प्रमोद झीले याना तू हे बातमी का टाकली म्हणून शिवीगाळ करून धमकी दिली .आज सर्वत्र कोरोना या रोगाने थैमान घातले असता या ना नियंत्रणासाठी सरकार , पोलिस कर्मचारी , डॉक्टर , आरोग्य सेविका , समाजसेवक आणि पत्रकार ही लोक लोकांनी आपल्या घरी राहावे , जास्तीत जास्त अंतर ठेऊन बोलावे , हात स्वच्छ धुवावे यासाठी जनजाग्रुती च्या माध्यमातून युध्दपातळीवर काम करत आहेत तरी सुध्दा येरला ग्राम पंचायत मध्ये लोकांना एकत्रित करून प्रेम युगलाचे लग्न लाऊन देणे हे जमावबंदी नियमांचे उल्लंघन नव्ये का??

अश्या गोष्ठीवर जर प्रकार बातमी च्या माध्यमातून जनजाग्रुती करत असेल तर त्याना शिवीगाळ आणि धमकी दिली जाते. या बाबत ची तक्रार आज दि . 29/03/2020 ला वडनेर पोलिस स्टेशन ला दिली असून पुढील तपास वडनेर पोलिस करीत आहेत .