Home जळगाव हिंगोली येथील पत्रकारास मारहाणीच्या घटनेचा एरंडोल तालुका पत्रकार संघातर्फे निषेध…!

हिंगोली येथील पत्रकारास मारहाणीच्या घटनेचा एरंडोल तालुका पत्रकार संघातर्फे निषेध…!

75
0

जळगाव – हिंगोली येथील न्यूज चॅनलच्या पत्रकाराला खिशात ओळखपत्र असताना देखील २९ मार्च रोजी पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याप्रकरणी या निंद्य घटनेचा एरंडोल येथील एरंडोल तालुका पत्रकार संघातर्फे निषेध करण्यात आला. राष्ट्रीय आपदा असली तरी पत्रकार हे जनजागृती साठी दिवसरात्र एक करीत असतात. प्रसंगी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता सगळी जनता घरात असतांना प्रतीनिधी दिवसभर रिपोर्टींग करीत असतात. परंतू मुजोर पोलिसांनी या पत्रकारावर अमानुष पणे लाठीमार केल्याने हा पत्रकार दवाखान्यात नरकयातना भोगतो आहे. हिंगोली पोलिसांना बडतर्फ करावे. त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.या भ्याड व निंद्य घटनेचा पञकार संघातर्फे निषेध करण्यात येऊन या घडलेल्या निंदनिय प्रकारासंदर्भात आज ३० मार्च रोजी तहसीलदार कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. निवेदनावर एरंडोल तालुका पञकार संघाचे अध्यक्ष बी.एस.चौधरी, सचिव संजय बागड यासोबतच कुंदन ठाकूर, कैलास महाजन, प्रा. सुधीर शिरसाठ, दिपक बाविस्कर,प्रा.नितीन पाटील, नितीन ठक्कर, पिंटू राजपूत, रतिलाल पाटील, आबा महाजन, पंकज महाजन, कार्यकारी सदस्य शैलेश चौधरी आदी पत्रकारांच्या स्वाक्षर्याय आहेत.