Home सातारा लांडेवाडीत ३८ युवकांनी केले रक्तदान…!

लांडेवाडीत ३८ युवकांनी केले रक्तदान…!

36
0

मायणी – सतीश डोंगरे

सातारा – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकिचे भान ठेवून लांडेवाडी ता खटाव येथील ३८ युवकांनी रक्तदान केले.

लांडेवाडी ग्रामस्थ आणि मेडिकल सायन्स रिसर्च ब्लड बँक मायणी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

अनेक हाँस्पिटल, रक्तपेढीकडे रक्ताची कमतरता असल्याने युवकांनी आपली जबाबदारी लक्षात घेऊन रक्तदान करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. या शिबिरात ३८ युवकांनी उत्सफुर्तपणे रक्तदान केले. पुसेसावळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ अमित ठिगळे यांनी सामाजिक कार्यकर्ते महेश पाटील यांच्या उपस्थितीत शिबीराचे उद्घाटन केले. औंध येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ विलास साळुंखे, सचिन chavan डॉ पुष्कर देशमुख यांचे विशेष सहकार्य लाभले.

तरुणांनी बांधिलकी जपली -देशाबद्दल असलेले प्रेम आणि रक्तपेढीकडे रक्ताची होत असलेली कमतरता लक्षात घेऊन तरुण पिढीने रक्तदान सारखे अनमोल दान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. हा उपक्रम गरजूंना अतिशय उपयुक्त ठरेल.

डॉ अमित ठिगळे, वैद्यकीय अधिकारी प्रा. आरोग्य केंद्र पुसेसावळी

Unlimited Reseller Hosting