Home महत्वाची बातमी कोरोनाचा संसर्ग प्रतिबंधासाठी पत्रकाराने दुकाना समोर आखले गोलाकार हातात घेतला ब्रश

कोरोनाचा संसर्ग प्रतिबंधासाठी पत्रकाराने दुकाना समोर आखले गोलाकार हातात घेतला ब्रश

77
0

प्रतिनिधी – रवि गवळी

मुंबई – उपनगरात मालाड पूर्व येथील कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी संपर्क कमी करा, तीन फूट लांब रहा असे वारंवार आवाहन करुनही नागरिक एेकण्याच्या स्थितीत नाही असे लक्षात आल्यानंतर जीवन ज्योत सामाजिक सेवा संस्थाचे अध्यक्ष व पत्रकार संरक्षण समिती चे सभासद रवि गवळी यांनी स्वतः हातात ब्रश पेंट घेऊन दफ्तरी रोड मालाड पूर्व येथील मेडिकल किराणा दुध दुकानांसमोर काही फुटांवर चौकोन आखून त्यातच ग्राहकयांना थांबण्याची सक्ती दुकानदार यांना सांगितले सोशल डिस्टन्सिंग मुळे दुकानांसमोर अशा चौकानातच नागरिक रांगेत उभे राहिल्याचे चित्र दिसत होते.

कोरोनाचा विषाणू तीन फुटांपर्यंत लांब जात नाही असे तज्ज्ञांनी सांगितल्यामुळे नागरिकांनी एकमेकांचा संपर्क तीन फुटांवरुनच करावा असे आवाहन करण्यात येत होते. एकतर गर्दी करु नका, जर आवश्‍यक असेल तर दोघांमध्ये किमान तीन फुटांचे अंतर ठेवा असे मुख्यमंत्री आरोग्यमंत्री गृहमंत्री प्रधान मंत्री वारंवार आवाहनही करण्यात येत आहे. तरीही गेले दोन तीन दिवस नागरिकांनी बाजारात, दुकानात गर्दी करताना या सूचनेची ऐशीतैशी केली होती. त्यामुळे प्रशासनाने संचारबंदी लागू केली बाजार, दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
आज सकाळी उपनगरात काही भागात नागरिकांना लागणारी जीवनआवश्यक वस्तूची दुकाने, किराणा दुध डेअरी, पेट्रोलपंप सुरु असल्याने . तेथे गर्दी होती. पण, दफ्तरी रोड येथील शुक्ला डेअरी,व इतर डेअरीच्या दुकानांसमोर प्रत्येकी तीन फुटांवर चौकोन आखून दिले होते. त्यातच गिऱ्हाईकांनी उभे रहावे असे आवाहन दुकानदार करत होते. तोंडाला मास्क अथवा रुमाल बांधून नागरिक तीन फुट अंतर ठेवून रांगेत उभे असल्याचे चित्र विविध दुकानांसमोर दिसत होते. हेच जर तीन चार दिवस आधी केले असते तर बरे झाले असते अशा नागरिकांच्या प्रतिक्रिया उमटल्या.

Unlimited Reseller Hosting