Home महत्वाची बातमी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन बुलडाणा जिल्ह्यातील आरोपी फरार , उडाली खळबळ...

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन बुलडाणा जिल्ह्यातील आरोपी फरार , उडाली खळबळ ,

291
0

अमीन शाह

हिंगोली जिल्ह्यातील हट्टा पोलीस स्टेशन हद्दीत काही दिवसांपूर्वी चोरीची घटना घडली. यामध्ये दागदागिने चोरट्यांनी घर फोडून लंपास करण्यात आला होता. याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी पोलिसांच्या तावडीतून फरार झाला आहे. शौचालयास जाऊन येतो, असं सांगून कैदी बाहेर पडला आणि पोलिसांच्या हातावर तुरी देत त्याने पोबारा केला आहे.

घरफोडी प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला. त्यानंतर दोन दिवसापूर्वी दिनांक 20 मार्च रोजी जलदगतीने तपास करीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील मौजे उखळी या गावातून दोन आरोपींना ताब्यात घेतलं होतं. यातील एका आरोपीला बाल सुधार गृह मध्ये ठेवण्यात आले. तर दुसऱ्याला हट्टा पोलीस ठाण्यात त्याला जेरबंद केलं.
मात्र आज सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ईश्वर पवार हा आरोपी शौचाला जाण्याच्या बहाण्याने फरार झाल्याने खळबळ उडाली. आज सकाळी साडे पाच वाजता हा घरफोड्या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला असल्याने पोलिसांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
फरार आरोपींच्या शोधासाठी हट्टा पोलीस ठाण्यातील दोन पथके तथा स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथके सकाळपासून घरफोड्या फरार आरोपीचा शोध घेत आहेत. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन अट्टल घरफोड्या करणाऱ्या आरोपी फरार झाल्याने हट्टा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.