Home महत्वाची बातमी वीज बिल भरू नका विधुत पुरवठा खंडित होणार नाही , ???

वीज बिल भरू नका विधुत पुरवठा खंडित होणार नाही , ???

528

अमीन शाह

देशात कोरोना व्हायरसबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची संख्या आहे. या पार्श्वभूमीवर आज सरकारकडून अनेक मोठे निर्णय घेण्यात येत आहे. राज्यभरात उद्यापासून कलम 144 लागू करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी बसची सेवा 31 मार्च पर्यंत बंद करण्यात येत असल्याची माहिती दिली. त्यानंतर आता उर्जामत्री नितीन राऊत यांनी वीज बिलासंदर्भात मोठी घोषणा केली आहे.
उर्जामंत्री नितीन राऊत यांनी, 23 मार्चपासून ग्राहकांचे मीटर रीडींग घेऊ नये आणि बिले देऊ नयेत. सगळे वीज बिल अ‍ॅव्हरेज देण्यात येईल. बिल भरले नसेल तरीही वीज पुरवठा खंडीत करू नये. वीज कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी वीज चोरी तक्रारीसाठी किंवा बिल तक्रार असल्यास ग्राहकांकडे जाऊ नये अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.