Home जळगाव आदर्श ग्रामविकास अधिकारी पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रितम शिरतुरे यांचा रावेर तालुका बौध्द समाजातर्फे

आदर्श ग्रामविकास अधिकारी पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रितम शिरतुरे यांचा रावेर तालुका बौध्द समाजातर्फे

62
0

रावेर शरीफ शेख

साकरी ता. भुसावळ येथे कार्यरत असलेले व रावेर येथील रहिवाशी ग्रामविकास अधिकारी आयु. प्रितम रघुनाथ शिरतुरे यांना महाराष्ट्र शासना तर्फे दि. १२ मार्च रोजी मुंबई येथे मा. राज्यपाल भरतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत ग्रामीण विकास मंत्री मा.ना. हसन मुश्रीफ व ग्रामीण विकास राज्यमंत्री मा.ना. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आदर्श ग्राम विकास अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल आज रोजी रावेर तालुका बौध्द समाज्याच्या वतिने येथील फुले शाहु आंबेडकर वाचनालयात त्यांचा बुध्द आणि त्याचा धम्म हा ग्रंथ,शाल, पुष्पहार व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी भारिप बहुजन महासंघाचे तालुका अध्यक्ष बाळु शिरतुरे, मा. नगरसेवक अॅड. योगेश गजरे, सामाजिक कार्यकर्ते महेश तायडे व प्रदिप सपकाळे यांनी मनोगत व्यक्त करून आयुष्यमान प्रितम शिरतुरे यांच्या कार्याचा गौरव केला. सत्कार समारंभास भारतीय बौध्द महासभेचे केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे, नगरसेवक जगदीश घेटे, भारतीय बौध्द महासभा जिल्हा संघटक विजय अवसरमल,अॅड. सुभाष धुंदले, अॅड. दिपक एच. गाढे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्ष सावन मेढे, सचिव संघरक्षक तायडे, कोषाध्यक्ष धनराज घेटे, सामाजिक कार्यकर्ते महेश तायडे, दिलीप साबळे, पंकज वाघ, समता सैनिक दलाचे बाळु रजाने, सामाजिक कार्यकर्ते महेश लोखंडे,प्रा. मोहन लहासे, राहुल डी. गाढे, भास्कर वाघ, नितीन तायडे, राहुल राणे, निलेश तायडे, सिताराम वानखेडे यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंलाचल संघरत्न दामोदरे यांनी केले तर आभार प्रदर्शन फुले,शाहु,आंबेडकर वाचलनालयाचे अध्यक्ष राजेंद्र अटकाळे यांनी केले.