पश्चिम महाराष्ट्र

सामाजिक माध्यमाद्वारे कोरोनाग्रस्तांची नावे उघड करणाऱ्यांवर कारवाई करणार – विभागीय आयुक्त डाॅ.म्हैसेकर

Advertisements

राजेश भांगे

कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची नावे सामाजिक माध्यमातून (सोशल मिडिया) उघड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल,असा इशारा विभागीय आयुक्त डाॅ. दीपक म्हैसेकर यांनी दिला आहे.
अशा परिस्थितीत सर्वांनी दक्षता घेणे आवश्यक आहे.आपत्तीच्या प्रसंगी प्रशासनाला सहकार्य करण्याची जबाबदारी सर्वांचीच असते.नावे उघड झाल्यास विनाकारण त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना त्रास होऊ शकतो.तेव्हा नागरिकांनी सामाजिक भान ठेवणे आवश्यक आहे.कोणीही नावे उघड करता कामा नये,असे आम्ही पहिल्या दिवसांपासून आवाहन करीत आहोत ;परंतु सोशल मिडियातून कोणीतरी चुकीची माहिती प्रसारित करून समाजामध्ये संभ्रम निर्माण करीत आसल्याची तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली आहे.
या अनुषंगाने पोलिस विभागाचा सायबर सेल लक्ष ठेऊन आहे. यासंबंधी कोणी अफवाह पसरवित असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल,असे डाॅ.म्हैसेकर यांनी सांगितले आहे.

You may also like

पश्चिम महाराष्ट्र

अशोकराव आव्हाळे यांचा स्मितसेवा फाऊंडेशन हडपसर यांच्या वतीने‌ सत्कार 

आज दि. 11/10/2020 रोजी अशोकराव आव्हाळे सांचा स्मितसेवा फाऊंडेशन हडपसर यांच्या वतीने कोरोना योद्धा म्हणुन ...
पश्चिम महाराष्ट्र

मा.श्री किरण भोसले साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरोली एमआयडीसी यांच्या कार्यतत्परतेला सलाम

  श्री किरण भोसले साहेबांचं कार्य अत्यंत कौतुकास्पद अस मनाव लागेल. कारण कोणतेही कार्य हाती ...
पश्चिम महाराष्ट्र

राज्यस्तरीय बचत गट परिषद- 2020 देशाच्या विकासामधे महिलांच योगदान खूप मोलाच आहे –  डॉ श्री प्रशांत खांडे

“बचत गट ….महिला विकास” राज्यस्तरीय बचत गट परिषद संपन्न दि. 13 सप्टेंबर 2020 रोजी पुणे ...