Home विदर्भ बिबी येथे ‘संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन

बिबी येथे ‘संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन

56
0

कोरपना – मनोज गोरे

चंद्रपुर जिल्हा स्मार्ट ग्राम बिबीच्या जागतिक महिला दिनानिमित्त बचत गटाच्या महिलांचा मेळावा व विविध सांस्कृतिक कार्यक्रम ‘संवाद’चे नुकतेच आयोजन पार पडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत बिबीचे उपसरपंच आशिष देरकर उपस्थित होते तर उद्घाटन राजुरा पंचायत समितीच्या माजी सभापती कुंदा जेनेकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मंचावर पंचायत समिती सदस्या सविता काळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकर आस्वले, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष नामदेव ढवस, गुरुदेव सेवा मंडळाचे सचिव बापूजी पिंपळकर, कोषाध्यक्ष आनंदराव पावडे, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष रामदास देरकर, श्रावण चौके, शेख रशीद व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी महिला बचत गटाच्या महिलांना स्वयंरोजगारावर मार्गदर्शन करण्यात आले. महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात आले. पाहुण्यांच्या हस्ते ६ अशा सेविकांचा सत्‍कार करण्यात आला व शेवटी बक्षीस वितरण करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. संचालन शीतल पावडे हिने केले तर आभार पूजा खोके यांनी मानले. यशस्वितेकरिता ग्रामपंचायत बिबीचे कर्मचारी व समस्त गावकऱ्यांनी सहकार्य केले.