Home बुलडाणा त्यांना करोना वायरस नसल्याचा अहवाल ,

त्यांना करोना वायरस नसल्याचा अहवाल ,

335
0

काल जिल्हा सामान्य रुग्णालयात झाला होता मृत्यू ,

अमीन शाह

बुलडाणा

काल चिखली येथील एका वृद्ध इसमाचा जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला होता त्यांच्या मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती मात्र आज दुपारी त्यांना करोना वायरस नसल्याचा अहवाल प्राप्त झाला असून आज सर्व जिल्हा वासीयांनी सुटकेचा निश्वास घेतला आहे , अफवेने आज बुलडाणा येथे भरणारा आठवडी बाजार सुद्धा जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी एका आदेशानुसार स्थगित केला होता ,
आज नागपूर येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज चा अहवाल प्राप्त झाला असून यात सदर रुग्णास करोना वायरस नसल्याचे स्पष्ट झाले आहे , सुटकेचा निश्वास सोडू नका आपल्या आरोग्याची काळजी घ्या असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे ,