Home विदर्भ कोरपणा तहसील कार्यालयात नायब तहसीलदारच नाही.

कोरपणा तहसील कार्यालयात नायब तहसीलदारच नाही.

763

कामाचा वाढतोय ताण ; कामांनाही होतो विलंब…!

कोरपना – मनोज गोरे

113 गावाचे तालुक्याचे स्थान असलेल्या कोरपना येथील तहसील कार्यालयात एकही नायब तहसिलदार नसल्याने कामाचा खोळंबा वाढते आहे.
याठिकानी नायब तहसीलदार ची तीन पदे मजूर आहे. मात्र सद्यस्थितीत एकही जागा भरली गेली नसल्याने पदे रिक्त आहे. तहसीलदारांना सहयोगी व त्यांच्या अनुपस्थितीत विविध प्रकारच्या कामाच्या जबाबदाऱ्या या महत्वपूर्ण अधिकाऱ्यावर असतात. त्यामुळे येथील कामाचा बोझा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तालुक्याची व्यापी मोठी असल्याने दूर अंतरावरून येणाऱ्या व्यक्तीचे काम एकाच दिवसात होत नाही. कामास विलंब लागतोय आहे. यासह या कार्यालयातील लिपिक टंकलेखक ची 12 पदे मंजूर असून यातील तीन पदे, शिपायाची 11 पदे मंजूर असून सहा पदाचा अनुशेष आहे. त्यामुळे तालुक्याचा गाडा चालवणारे मुख्य कार्यालयच रिक्त पदांमुळे अस्थिपंजर झाले आहे.
या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सदनिकांची व्यवस्था बरोबर नसल्याने सुसज्ज सदनिका बांधण्यात यावी. त्यांच्या निवासाची सोय करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
तेलंगणा राज्य सीमेवरील कोरपना हे महत्वपूर्ण तालुक्याचे स्थान असल्याने येथील पदे तातडीने भरण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त होते आहे.