Home मराठवाडा महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी ग्रामीण डाक जीवन विमा लाभ घ्यावा – सुरेश...

महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी ग्रामीण डाक जीवन विमा लाभ घ्यावा – सुरेश सिंगेवार

178

नांदेड , दि. ०६ :- दिनांक दि.५ मार्च रोजी नखातेवाडी इस्लापुर येथे भारतीय डाक विभागाच्या वतीने शंभर टक्के आदिवासी असलेले “संपूर्ण बिमा ग्राम’ योजने अंतर्गत या गावाची निवड नांदेड डाक अधीक्षक कार्यालयाने केली होती.
या “संपूर्ण बिमा ग्राम’ योजनांची माहिती गावातील नागरिकांना देण्यासाठी डाक निरीक्षक किनवट आभिनव सिन्हा व नांदेडचे मार्केटिंग एक्सएटिव्ह सुरेश सिंगेवार यांनी हे उपस्थित होते.
या गावातील नागरिकांना मार्गदर्शन करताना सिंगेवार म्हणाले की भारतीय स्त्रिया वर अनेक प्रकारची बंधने घातली आहेत. ही याच समाजाद्वारे घातली होती.सतीची चाल,विधवांचे केशपण, अश्या अनेक प्रकारच्या चालीरीतीने वर्ष न वर्ष स्त्रियावर अन्याय होत होता.ते दूर करण्याचे काम माहात्मा फुले,बाबासाहेब आंबेडकर, या सारख्या अनेक समाजसुधारकांनी केली.
आज प्रत्येक क्षेत्रा मध्ये स्त्रियाना समानता देण्यात आली आहे असल्याचे सिंगेवार यांनी सांगितले.
पुढे बोलताना म्हणाले की डाक विभागाने गावागावात संपूर्ण बिमा ग्राम गाव ग्रामीण डाक जीवन विम्याच्या मार्फत करण्याचे भारत सरकारने ठरवले आहे.
या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला व पुरुषाचे मायक्रो लहान -लहान ग्रामीण डाक विमा पॉलिशी प्रत्येक व्यक्तीच्या नावे एक पॉलिशी कमी कालावधीची देऊन त्या मिळालेल्या पैशातून लहान लहान व्यवसाय करता येईल.यामुळे ग्रामीण भागातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल असे सिंगेवार यांनी मार्गदर्शन केले.
नखातेवाडी येथे ५४ घरे आहेत तर या गावात संपूर्ण बिमा ग्राम ५६ प्रस्ताव घेऊन हे १००% संपूर्ण ग्रामीण डाक जीवन विमा ग्राम करण्यात आले असल्याचे डाक निरीक्षक किनवट आभिनव सिन्हा यांनीं सांगितले.
पुढे बोलताना सिन्हा म्हणाले पोस्ट ऑफिस मध्ये ग्रामीण भागातील नागरिकांसाठी बचत करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना आहेत.व्याजदर आकर्षक आहेत प्रत्येककानी यांचा लाभ घ्यावा असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
या कार्यक्रमात सरपंच बेबीताई कैलास जाधव, उपसरपंच सुनंदा प्रकाश नखाते,तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष भुराजी नखाते,बाबुराव सटवाजी मेंटकर, कैलास जाधव, ग्रामसेवक एस. व्ही.शिराल्पल्लू,शाखा डाकपाल मुळझरा संजय राठोड, शाखा डाकपाल वसंत राठोड कोल्हारी,शाखा डाकपाल संजय राठोड नांदगाव, शाखा डाकपाल ज्ञानेश्वर नूनेवार भिसी, हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष नखाते यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय राठोड यांनी केले.