Home महत्वाची बातमी अवैधरित्या घातक शस्त्र बाळगणार्याला अटक चार तलवारीसह एक खंजर जप्त

अवैधरित्या घातक शस्त्र बाळगणार्याला अटक चार तलवारीसह एक खंजर जप्त

43
0

स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही

रवि माळवी

यवतमाळ , दि. ०६ :- रामरहीम नगर येथील आरोपीने आपल्या राहत्या घरात मोठा घातक शस्त्रसाठा जमा केला असता यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या घरी धाड टाकून चार धारधार तलवारीसह एक खंजर जप्त केला. पोलीसांनी ही कार्यवाही दिनांक ५ मार्च रोजी केली.
अब्दुल शकील अब्दुल मुनाफ (३०) रा.रामरहीम नगर असे पोलीसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. दिनांक ५ मार्च रोजी पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार हे त्यांचे पथकासह स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ येथे हजर असतांना आरोपीने आपले राहते घरी मोठा घातक शस्त्रसाठा बाळगुण असल्याची विश्वसनीय माहिती मिळाल्यावरुन पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार यांनी सदरची माहीती वरिष्ठांना देवून सोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद पाचकवडे, विनोद चव्हाण, पंच व स्थानिक गुन्हे शाखे कडील पोलीस स्टाफ सह रामरहीम नगर येथे रवाना होवून आरोपीच्या घराची झडती घेतली असता चार नग धारधार तलवारी व एक खंजर असे एकुण ७ हजार रुपये किंमतीचे घातक शस्त्रे आरोपीच्या स्वत:चे राहते घरात विनापरवाना मिळून आल्याने पंचासमक्ष जप्त करुन आरोपी विरुध्द यवतमाळ शहर पोलीस स्टेशनला ४/२५ भारतीय हत्यार कायदा व कलम १३५ म.पो.कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक, यवतमाळ एम.राज कुमार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदिप शिरस्कर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद पाचकवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार, पोलीस हवालदार बंडु डांगे, विशाल भगत, हरिष राऊत, गजानंद हरणे, ममता देवतळे, सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी पार पाडली.
Unlimited Reseller Hosting