Home महत्वाची बातमी तिरुपती मंदिराने ट्रस्टने Yes Bank च्या संकटाला आधीच ओळखलं, असे वाचवले तब्बल...

तिरुपती मंदिराने ट्रस्टने Yes Bank च्या संकटाला आधीच ओळखलं, असे वाचवले तब्बल १३०० कोटी

154

नांदेड , दि.६ ; ( राजेश भांगे ) –
हैदराबाद रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) येस (Yes) बँकेवर आर्थिक निर्बंध घातले आहे. येस बँकेच्या खातेदारांना ५ मार्च ते ६ एप्रिलदरम्यान बँकेतून फक्त ५० हजार रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र हे संकट येण्याच्या काही महिने आधीच आंध्र प्रदेशातील तिरुपती वेंकटेश्वर मंदिर ट्रस्टने येस बँकेतून तब्बल १ हजार ३०० कोटींची रक्कम काढली होती.वाय. व्ही. सुब्बा रेड्डी यांनी तिरुपती देवस्थानच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर लगेच येस बँकेतून मंदिर प्रशासनाचे १ हजार ३०० कोटी रुपये काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. या ट्रस्ट चार प्रायव्हेट बँकांमध्ये फंड जमा केलेला आहे, ज्यामध्ये येस बँकेचाही समावेश होता.येस बँकेच्या खातेधारकांना ५० हजारांहून अधिकची रक्कम काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेची परवानगी घ्यावी लागणार आहे. खातेदारांना फक्त वैद्यकीय उपचार, विदेशी शिक्षण आणि लग्नासाठी हे पैसे काढता येतील. पण त्यासाठी रिझर्व्ह बँकेची विशेष मंजुरी घ्यावी लागणार आहे. येस बँकेवर सरकारने केलेल्या कारवाईमुळे येस बँकेच्या खातेदारांवर आर्थिक कुऱ्हाड कोसळणार आहे. वाढत्या कर्जाच्या बोजामुळे येस बँक अडचणीत आली आहे.शेअर बाजार शुक्रवारी उघडताच शेअर्स गडगडल्याचं पाहायला मिळत आहे. शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स तब्बल ११०० अंकानी गडगडला आहे. डॉलरची किंमत ७४ रुपये झालं आहे. तर निफ्टी ३८१ अंकांनी कोसळली आहे. आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजारात उसळी होती मात्र शेवटच्या दिवशी मोठ्य़ा प्रमाणात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे.सेन्सेक्स १ हजार ६७ अंकांनी घसरून ३७, ४०४ अंकानवर आहे तर निफ्टी ३२५ निर्देशांकांनी घसली असून १०, ९४४ अंकांवर आहे. येस बँकेचे शेअर्स तब्बल २५ टक्क्यांनी घसल्याचं पाहायला मिळत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) येस (Yes) बँकेवर घाललेल्या आर्थिक निर्बंधांमुळे हा फटका बसल्याचं शेअर मार्केट तज्ज्ञ आशुतोष वाखरे यांचं म्हणणं आहे. या आधी कोरोना व्हायरसमुळे शेअर बाजाराला मोठा फटका बसला होता आणि सोनं तेजीत आलं होता. आता येस बँकेवर घातलेल्या निर्बंधांमुळे बाजार उघडताच शेअर घसरल्याचं पाहायला मिळत आहे.