कोरपना – मनोज गोरे
तालुक्यातील प्रसिद्ध दर्गा जनतेचे श्रद्धास्थान कुसळ येथील दुल्हेशाह बाबा यांचा उरस होळीच्या तीन दिवस अगोदर पासुन दरवर्षी होत असते या उरस ला तालुक्यातील व तालुक्या बाहेरील जनता या उरसला हजेरी लावुन आपली मनते पुर्ण करण्यासाठी दर्ग्यावर नतमस्तक होतात तिन दिवस चालणाऱ्या या उरसला जत्रा ही भरते व विविध कार्यक्रमांचे सुद्धा आयोजन करण्यात येते सर्वच जाती धर्माचे या ठिकाणी हजेरी लावत असतात या वर्षी दिनांक सहा तारखेला सुरु होणारा उरस आठ तारखेला संपणार आहे कौमी एकता समारोह या कार्यक्रमाचे अध्यक्ष बल्लारपूर चे आमदार तसेच माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे राहणार असुन उदघाटक खासदार बाळुभाऊ धानोरकर हे राहणार आहे तर विषेश अतिथी म्हणून आमदार किशोर जोरगेवार, माजी आमदार संजय धोटे राहणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून चंदनसींग चंदेल, अहेते शाम अली, हरीष शर्मा, राजेंद्र वैद्य, गोदरुपाटील जुमनाके, विजयरावजी बावणे, सतीश धोटे, अरुण नवले, अँड शाकीर मलक, इमारती भाई, सोहेल भाई, मिनाज भाई, वसंता मडावी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत तर आठ तारखेला वसीम साबरी रेडीओ टिव्ही सिंगर दिल्ली व रुबीताज रेडीओ टिव्ही सिंगर मुंबई यांचा दुय्यम कव्वाली चा शानदार मुकाबला होणार आहे तरी समस्त जनतेने याचा लाभ घ्यावा असे आवाहन सय्यद आबिद अली, रऊफ खान वजीर खान, बाबाराव सिडाम, मनसुर भाई पारेख यांनी केली आहे या कार्यक्रमाला जिवती, राजुरा, वणी, बल्लारपूर, अशा विविध ठिकाणावरून जनता येत असतात विशेष म्हणजे या कार्यक्रमाला सर्व जाती धर्माची जनता एकत्र येवून आनंदाने कार्यक्रम पार पाडतात तीन दिवस कुसळ येथे मोठी रेलचेल राहते.









































