Home जळगाव मुस्लिम मंच च्या धरणे आंदोलनाला ६६ दिवस पूर्ण ,  आज शनिवारी महिला...

मुस्लिम मंच च्या धरणे आंदोलनाला ६६ दिवस पूर्ण ,  आज शनिवारी महिला दीन निम्मित महिलांचे धरणे आंदोलन

66
0

रावेर (शरीफ शेख)

जळगाव मुस्लिम मंच तर्फे जिल्हाधिकारी जळगाव कार्यालयाबाहेर सुरू असलेल्या धरणे आंदोलनाचा शुक्रवार ६६ वा दिवस या दिवशी शहरातील विविध सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधींनी सहभाग नोंदवून आपला विरोध नोंदविला.

आंदोलनाची सुरुवात फारुक शेख यांच्या पवित्र कुराण पठाणाने झाली तर समारोप जैनुद्दीन शेख यांच्या दुवा ने करण्यात आला सुरुवातीलाच फारुक शेख यांनी जगभर आठ मार्च रोजी महिला दिवस साजरा केला जाणार आहे त्याच धर्तीवर शनिवार सात मार्च रोजी आपल्या धरणे आंदोलनाचे नेतृत्व व सक्रिय सहभाग सुद्धा जळगाव शहरातील सर्व धर्मियांच्या महिला सहभागी होऊन आपला विरोध प्रकट करणार असल्याचे नमूद केले.
युसरा मकरानी या लहान बालिकेने उत्कृष्ट असा राष्ट्रीय एकात्मतेचा गीत सादर केला वरिष्ठ पत्रकार रशीद कासमी यांनी एनपीआर हा कशाप्रकारे ऐच्छिक विषय आहे हे समजावून सांगितले तर आसिफ अन्वर शेख यांनी समाजातील काही लोकांचा वापर राजकीय शक्ती करीत असून तरुणांनी त्यांच्या आहारी जाऊ नये असे आव्हान केले. हाफिज शहीद यांनी आपले विचार मांडताना नेतृत्वाचा स्वीकार करावा असे आवाहन केले अल्ताफ शेख व अकील मणियार यांनी सुद्धा आपले विचार मांडले यावेळी आसिफ देशपांडे यांनी तरुण व तरुणींनी व्हाट्सअप व सोशल मीडियाद्वारे एनपीआर व एन आर सी हे विषय समजून आपल्या मोहल्ल्यात ,वार्डात लोकांना शिक्षित करणे व सोशल मीडियाचा वापर योग्य तऱ्हेने करावा असे आव्हान केले.
यावेळी भाजपचे असलम पठाण अजिज सिकलीकर ,जुलकर नयन ,रोशा पहिलवान, अबरार खाटीक, हाफिज रिजवान, वसीम शेख सय्यद सलीम हसन, अन्वर सिकलिगर यांची उपस्थिती होती.

*उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी यांना निवेदन*
वरिष्ठ पत्रकार रशीद कासमी यांच्या नेतृत्वात उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी सोबत बशीर शेख हाफीज शाहिद ,वसीम शेख ,सलीम सय्यद ,जैनुद्दीन शेख ,रोशन खा, शौकत अली, अन्वर सिकलिगर व अजिज सिकलीकर उपस्थित होते.