Home जळगाव पाचोरा नगरपरिषदेची प्‍लॅस्‍टीक बंदी बाबत धडक मोहीम

पाचोरा नगरपरिषदेची प्‍लॅस्‍टीक बंदी बाबत धडक मोहीम

149

निखिल मोर

पाचोरा , दि. ०५ :- म.सचिव सो. महाराष्‍ट्र राज्‍य प्रदुषण नियंत्रण मंडळ, मुंबई यांचेकडील परिपत्रक महाराष्‍ट्र प्‍लॅस्‍टीक व थर्माकोल अविघटनशिल वस्‍तूंचे (उत्‍पादन, विक्री, वापर, वाहतुक, हाताळणी, साठवणूक) अधिसुचना 2018 नूसार प्‍लॅस्‍टीक कॅरी बॅग, नॉन ओव्‍हन पिशव्‍या, वापरास बंदी घातलेली आहे. त्‍यानूसार पाचोरा नगरपरिषदेने दिनांक 05/03/2020 रोजी “प्‍लॅस्‍टीक मुक्‍त पाचोरा शहर अभियानाअंतर्गत” पाचोरा शहरातील विविध प्‍लॅस्‍टीक पिशव्‍या (सिंगल युज) विक्री करणा-या दुकानांवर धडक मोहिम राबविण्‍यात आली नगरपरिषदेकडून शहरातील आस्‍थापना,दुकाने, फेरीवाले, हॉटेल्‍समध्‍ये अनाधिकृतपणे व शासनाने बंदी घातलेल्‍या प्‍लॅस्‍टीक पिशव्‍या जप्‍त करण्‍याची धडक मोहिम राबविण्‍यात आली यावेळी सुमारे 10,000/- मात्र दंड जप्‍त करण्‍यात आला. यात प्रथम गुन्‍ह्यासाठी रु. 5000/-, दुस-या गुन्‍ह्यासाठी 10,000/- व तिस-या गुन्‍ह्यासाठी रु.25,000/- तसेच 3 महिने कैद अशी दंडाची तरतूद आहे.
यापुढे देखील मोहिम सुरुच राहणार असून सुचना देऊन देखील पुन्‍हा पुन्‍हा बंदी असलेल्‍या प्‍लॅस्‍टीक पिशव्‍या विक्री करणा-या दुकानदारांविरुध्‍द यापुढे कडक कारवाई केली जाणार आहे. नागरीकांनी देखील प्‍लॅस्‍टीक पिशव्‍यांचा वापर पुर्णपणे बंद करुन घरुनच कापडी पिशवी घेऊन बाहेर पडावे शहरातील सामाजीक संस्‍थांशी संपर्क करुन प्‍लॅस्‍टीक बंदी मोहीमेत उत्‍स्फुर्त सहभाग नोंदवावा तसेच प्‍लॅस्‍टीक वापराबाबत काही शंका असल्‍यास व्‍यापारी बांधवांनी नगरपरिषदेत येऊन शंका निरसन करण्‍याचे देखील आवाहन मुख्‍याधिकारी शोभा बाविस्‍कर यांनी केले.
सदरची मोहीम वेळी मुख्‍याधिकारी शोभा बाविस्‍कर प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, आरोग्‍य निरीक्षक धनराज पाटील, ललित सोनार, राजेश कंडारे, महेंद्र गायकवाड, भागवत पाटील, किशोर मराठे, आकाश खैरनार, गणेश अहिरे, बापुराव जाधव, मुकादम बापु ब्राम्‍हणे, राजू लहासे, निळकंठ ब्राम्‍हणे, देविदास देहडे, वाल्मिक गायवाड, सुनील वाकडे, संजय जगताप, विजय ब्राम्‍हणे, भास्‍कर ब्राम्‍हणे, किरण ब्राम्‍हणेआदी कर्मचारी उपस्थित होते.