Home उत्तर महाराष्ट्र पाचोरा जे. सी. आय. चा २८ वा पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न

पाचोरा जे. सी. आय. चा २८ वा पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न

73
0

अध्यक्षपदी जेसीस दिनेश अग्रवाल तर सेक्रेटरी पदी जेसी रोहित रिझानी

निखिल मोर

जळगाव / पाचोरा , दि. ०५ :- येथील जे. सी.आय. चा २८ वा पदग्रहण समारंभ भडगाव रोडवरील, स्वामी लॉन्स पाचोरा येथे नुकताच उत्साहात संपन्न झाला. यावेळी मावळते अध्यक्ष डॉ. आनंद जैन यांनी सन – २०१९ या वर्षातील त्यांच्या टीमने केलेल्या कार्याचा लेखा – जोखा मांडतांना ज्यांनी – ज्यांनी मला या वर्षभरात अनमोल सहकार्य केले आहे त्यांचा मी सदैव ऋणी राहीन. असे सांगितले. यावेळी व्यासपीठावर डॉ. आनंद जैन, डॉ. नम्रता जैन, अंकिता जैन, अभिषेक जैन, त्यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष दिनेश अग्रवाल (सी.ए.) झोनल प्रेसिडेंट चेतन गोपाल पटवारी, गौरव अग्रवाल, पार्थ खंडेलवाल, निखील दिनेश अग्रवाल आणि सेकेटरी पाटील माजी अध्यक्ष डॉ. सौरभ पटवारी, निरज बांठिया, मयूर दायमा उपस्थित. रोहित रीझानी यांना पिन प्रधान करण्यात आली. व त्यांच्याकडे पदभार सुपुत्र करण्यात आला. यावेळी डॉ. सुनील अग्रवाल झौनल प्रेसिडेंट चेतन पाटील, गोपाल पटवारी, नवनिर्वाचित अध्यक्ष दिनेश अग्रवाल (सी.ए.) यांनी आपल्यामनोगतातून सन २०२० मध्ये करावयाच्या कामगिरीचा अहवाल सादर केला. यावेळी माजी प्रेसिडेंट जीवन जैन गिरीश कुलकर्णी, लालचंद केसवाणी, रितेश ललवानी, रवी केसवानी राहुल जैन, अपूर्व थेपडे, निरज बांठिया उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती संचेती व पियुष संचेती आभार अभिषेक जैन यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व जैसीआय च्या आजी – माजी पदाधिका ? यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने करण्यात आली.