Home मुंबई दापचिरी मध्ये 10 एकर जमिनीवर इंग्रजी माध्यमाची शाळा उभारणार

दापचिरी मध्ये 10 एकर जमिनीवर इंग्रजी माध्यमाची शाळा उभारणार

68
0

आमदार कॉ. विनोद निकोले यांच्या प्रश्नावर आदिवासी विकास मंत्री यांचे उत्तर

मुंबई , दि. ०५ :- (प्रतिनिधी) – दापचिरी मध्ये 10 एकर जमिनीवर इंग्रजी माध्यमाची शाळा उभारणार असल्याचे आमदार कॉ. विनोद निकोले यांच्या प्रश्नावर आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांनी उत्तर दिले आहे. दरम्यान ते म्हणाले की, आदिवासी समाजाचे पालकांना वाटते कि आमचे पाल्य इंग्रजी शाळेत शिकला पाहिजे, पण शाळेची भरमसाठ असलेले फी, त्यामुळे ते शक्य होत नाही. त्यामुळे शासने याबाबत विचार करणे आवश्यक आहे.

विधानसभेत आज मौजे सरावली डहाणू येथे आदिवासी विकास संकुल उभारण्याबाबत चा प्रश्न डहाणूचे आमदार विनोद निकोले यांनी विधानसभेत मांडला होता. प्रश्न चर्चेला आला असताना आमदार कॉ. निकोले म्हणाले की, आदिवासी मुला- मुलींकरिता इंग्रजी माध्यमाची निवासी शाळा, शासकीय वसतीगृह, जनते करिता सांस्कृतिक भवन व आदिवासी प्रकल्प कार्यालय उभारण्याबाबतीत मौजे सरावली ता डहाणू येथे करण्यात बाबत प्रश्न विचारला होता. त्यावर आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांनी सांगितले की, आदिवासी विकास संकुल उभारण्याच्य प्रस्ताव मौजे दापचिरी डहाणू येथे 600 एकर जमिनी उपलब्ध होत आहे त्यातील 10 एकर जमिनीवर नमूद प्रकल्प उभारण्यात येईल.

दरम्यान दि. 04 / 04 / 2016 मध्ये या जागेबाबत चा प्रश्न सभागृहात उपस्थित करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना तत्कालीन आदिवासी विकास मंत्री यांनी सांगितले होते की, लोणीपाडा येथील 8 एकर जमीन इमारती बांधण्याकरिता प्राप्त झाली आहे व सदर जमीन मोजणी करीता भूमिअभिलेख कार्यालयात रक्कम देखील जमा करण्यात आली आहे. असे उत्तर देण्यात आले होते. पण आज आदिवासी विकास मंत्री सांगतात की, उप वन संरक्षक डहाणू वन विभाग सदर जमीन देण्यास नकार देत आहे. त्यामुळे या जागेचा संभ्रम होत असून सदर जागेबाबत पुढील पाठपुरावा आमदार म्हणून मी करेन असे आमदार कॉ. विनोद निकोले यांनी सांगत सत्य उघड करण्यासाठी संघर्ष करू असे ते म्हणाले.