Home मराठवाडा घरातून 53 लाख रुपयांचा गुटखा पान मसाला जप्त…!

घरातून 53 लाख रुपयांचा गुटखा पान मसाला जप्त…!

155

पोलिसांची मोठी कार्यवाही

अब्दुल कय्युम

औरंगाबाद , दि. ०५ :- अन्न व औषध प्रशासन औरंगाबाद आणि अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय औरंगाबाद यांचे पथकाने संयुक्तरित्या कारवाई घेऊन शेकटा येथील एक घरातून 53 लाख रु किमतीचा प्रतिबंधित गुटखा,पान मसाला,आणि इंपोर्टेड सिगरेटचा साठा जप्त केला. बुधवारी रात्री उशिरा ही कारवाई घेण्यात आली.औरंगाबाद ग्रामीण पोलीस विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक गावडे याना मिळालेल्या गुप्त माहिती आधारे अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत अजिंठेकर, फरीद सिद्दीकी यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातील पथकासह जाऊन शेकटा येथील प्रवीण झंवर याचे घराची झडती घेतली असता त्याचे घरात एक गुप्त गोदाम तयार केले असल्याचे आढळून आले.या गोदामाची पथकाने झडती घेतली असता तेथे मोठ्या प्रमाणावर गुटखा,पान मसाला,तंबाखू सिगारेट साठा अवैधरित्या विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवलेला आढळून आला. सादर साठयाची मोजणी सकाळ पर्यंत चालू राहिली. आरोपी प्रवीण संजय झंवर याचे ताब्यातून रु.52 लाखाचा पान मसाला,गुटखा जप्त केला तसेच. आवश्यक वैधानिक इशारा न छापलेल्या परदेशी सिगारेटचा 1लाख अठरा हजार रु चा साठा देखील जप्त करण्यात आला. आरोपी प्रवीण झंवर यांचे विरुद्ध करमाड पोलीस ठाण्यात भाद वि188,273, अन्न सुरक्षा कायदा कलाम 59 व सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ कायदा 2003 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई सह आयुक्त उदय वंजारी व सहाय्यक आयुक्त मिलिंद शाह यांचे मादर्शनाखाली करण्यात आली.

एवढा मोठा साठा आला कुठून ????

पोलिसांनी मोठी कार्यवाही करत मोठ्या प्रमानात गुटखा पान मसाला विदेशी सिगरेट चा साठा जप्त केला , मात्र एक प्रश्न सर्वस्मानण्यांना पडला आहे की या घरात एवढा मोठा साठा आला कुठून याच तपास होणे गरजेचे आहे ,