Home विदर्भ बचत गटातील महिलांना नविन योजना बदल मार्गदर्शन कार्यक्रम.!

बचत गटातील महिलांना नविन योजना बदल मार्गदर्शन कार्यक्रम.!

134

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. ०४ :- जिल्ह्यातील नेरी पुनर्वसन येथे,डॉ आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क,वर्धा. येथील क्षेत्रकार्य अंतर्गत आम्ही बचत गटातील महिलांना बचत गटा मार्फ़त राबविण्यात येणाऱ्या नविन योजना बदल माहिती देण्यासाठी कार्यक्रमआयोजित केला गेला. कार्यक्रमच्या मार्गदर्शिका सचिव सिमा पाटिल मैडम ह्यांनी महिलांना गटातील नविन योजनांची माहिती करुण दिली, कार्यक्रमाचे संचालन प्रणाली वेले ने केले, तर प्रस्ताविक विवेक राउळ ह्यांनी केले. सर्वात प्रथम कार्यक्रमाचि सुरुवात “इतनी शक्ति हमें दे न दा ता” या भक्ति गिताने झाली, मग v/0 सव्वालाखे मैडम नी महिलान सोबत घरबसल्या रोजगार कसा करायचा यावर चर्चा केली. मग उपसरपंच संगीता ताई कस्तूरे ह्यांनी गावातील महिलांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. त्यानंतर मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या सिमा पाटिल मैडम नी बचत गटातील नविन राबविल्या गेलेल्या योजनांची माहिती महिलांना दिली. नंतर कार्यक्रमाचे ‘आभार प्रदर्शन’ प्रिति तेलंग हिने केले, त्यात सर्वांचे आभार व्यक्त केले गेले, अशाप्रकारे डॉ .प्रा. प्रवीण वानखेड़े सर ह्यांच्या मार्गदर्शना खाली आम्ही सहकारी 5विद्यार्थिनी प्रतिक्षा पखाले, प्रतीक्षा कालबाडे, प्रिति राठौड़, प्रिति तेलंग, विवेक राउत,प्राजक्ता निखार, आणि प्रिया आष्टांकर इ.सहभागी झाले होते.