Home जळगाव मरण पत्कारू परंतु छावणी मध्ये जाणार नाही , “संविधान वाचवण्या साठी लोकशाही...

मरण पत्कारू परंतु छावणी मध्ये जाणार नाही , “संविधान वाचवण्या साठी लोकशाही मार्गाने सरकारशी लढा देऊ”

153

जळगाव मुस्लिम मंचतर्फे एकमुखी मांगणी

रावेर (शरीफ शेख)

जळगाव मुस्लिम मंच तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर सुरु असलेल्या आंदोलनाचा ६३ वा दिन अर्थात इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित मोहम्मद सल्ल. अलै सल्लम हे आपल्या वयाच्या ६३ व्या वर्षी मरण पावल्याने त्यांच्या वयाचे औचित्य साधुन त्यांनी ज्या प्रमाणे जीवनाच्या अंतिम क्षणा पर्यन्त मानव जातिची सेवा केली त्या अनुसार संविधान बचाव के लिये हम मौत को गले लगायेंगे पर डी टेन्शन कॅम्प नही जायेंगे या पक्तिला अनुसरून अनोखे आंदोलन करण्यात आले.

*छावणी- जनाजा- व मृत व्यक्ती चा सजीव देखावा*

सविधान ला वाचवण्यासाठी आम्ही आम्ही आमचे जीव जाईपर्यंत लोकशाही मार्गाने सरकारशी लढा देऊ परंतु कोणत्याही परिस्थितीत छावणी मध्ये जाणार नाही अशी आर्त हाक जळगाव मुस्लिम मंच च्या माध्यमाने जळगाव शहरातील हजारो हिंदू-मुस्लीम बंधू आणि भगिनी यांनी केली यावेळी आंदोलनस्थळी डेटेन्शन कॅम्प अर्थातच छावणीचे स्वरूप देण्यात आले होते त्याच्या दोन्ही बाजूला जनाजा ठेवण्यात आलेले होते व एक डेड बॉडी ठेवण्यात आली होती तेव्हा डी टेन्शन कैम्प मधील उपस्थित जनसमुदाय ओरडून सांगत होता आम्ही मरण पत्करू परंतु डीटेंशन कैम्प मध्ये जाणार नाही.

यावेळी डेड बॉडी मध्ये अल हिंदचे अध्यक्ष अल्ताफ हुसेन शेख, पोलीस च्या भूमिकेत वसीम शेख करामात व फारूक सिकलीगर यांनी तर छावनी मध्ये जळगाव शहरातील सर्व पक्षीय तसेच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील महनीय व्यक्तिमत्व उपस्थित होत्या त्यात प्रामुख्याने गफ्फार मलिक ,करीम सालार, मुफ़्ती हारून ,इक्बाल वजीर, शरीफ शहा ,फारुक शेख, फारूक आहिलेकार ,प्रतिभा शिंदे, शिवराम पाटील ,भारत ससाने, शांताराम वागडीकर, मुकुंद सपकाळे ,नगरसेवक अकरम देशमुख, प्राध्यापक युनूस शेख, डॉक्टर रिजवान खाटीक, जामनेरचे अश्फाक शेख व इम्रान खान, कविवर्य रागिब ब्यावली, अन्वर शिकलकर ,अजिज सिकलिगर, सालिम मनियार, ताहेर शेख, यासह हारुन शेख खलील टेलर ,अमजद खान, अआज हुसेन, आसिफ खान, दानिश बागवान, गुलाब बागवान, पांडुरंग महाजन, मोहम्मद सांडू, अश्फाक पिंजारी, रफिक बशीर, डॉक्टर एम एकबाल, डॉक्टर जबी, डॉक्टर अमानुल्ला, अब्दुल रहीम तडवी ,महिलांमध्ये अनिसा गुलाम, शाइना शकील, शनुर शेख, अमिना कासम, शहनाज मजिद, रुबीना एकबाल, जैतुनबी रमजान, अनिशा खान, रिजवाना रहमान, मुक्तार हाजी , मस्ताना अर्बिना, मुस्ताक आदींची उपस्थिती होती

*आंदोलकांना यांनी केले मार्गदर्शन*

प्रतिभा शिंदे, शिवराम पाटील, भारत ससाणे, इक्बाल वजीर, करीम सालार, फारुक शेख,मोबिन शेख, इकबाल शाह,सै नूर,जैनोद्दीन महबूब, असलम खान,गफ्फार मलिक, मुक्ती हारून, माजी नगरसेवक मुबिन शेख, मुकुंद सपकाळे व वृद्ध महिला जमीला शेख कासम यांनी आपली मते मांडली व *कोणत्याही परिस्थितीत आम्ही एन पी आर ला विरोध करू व कागदपत्र दाखवणार नाही वेळ प्रसंगी आम्ही मृत्यूला सामोरे जाऊ परंतु डीटेन्शन कैम्प मध्ये जाणार नाही ही अशी एकमुखी मागणी या सर्वांनी केली.*

*उपजिल्हाधिकारी यांना निवेदन*
प्रतिभाताई शिंदे यांच्या नेतृत्वात शकीला भिकन,सलमा बी इमरान,फरजाना रईस, मजीद ज़केरिया, मुकुंद सपकाले शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले व आम्ही एनपीआर चा बायकोट करीत असून महाराष्ट्र सरकारने एन पी आर लागू करू नये अशी एकमुखी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.