Home मराठवाडा मत्सयोदरी आभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘टू बी इंटरप्यूनर’ या विषयातील ‘इलेक्ट्रीकल व्हेएकल चार्जिंग’...

मत्सयोदरी आभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘टू बी इंटरप्यूनर’ या विषयातील ‘इलेक्ट्रीकल व्हेएकल चार्जिंग’ या तंत्राचे सादरीकरण करून राष्ट्रीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला.

726
0

सययद नजाकत – बदनापूर

जालना , दि. ०४ :- येथून जवळच असलेल्या मत्सयोदरी आभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी नांदेड येथे झालेल्या राष्ट्रीय चर्चासत्रात सहभाग नोंदवून त्याअंतर्गत झालेल्या ‘टू बी इंटरप्यूनर’ या विषयातील ‘इलेक्ट्रीकल व्हेएकल चार्जिंग’ या तंत्राचे सादरीकरण करून राष्ट्रीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. या यशाबददल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

नांदेड येथील गुरू गोविंद सिंग आभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरावरील तीन दिवसीय सेमीनार झाला या सेमीनारमध्ये देशभरातील आभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नेांदवलेला हेाता. या सेमीनारसाठी मत्सयोदरी आभियांत्रीकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांही सहभागी झाले होते. त्यापैकी पुष्कर तारो, अदनान सिददीकी, सम्यक खाडे, रणजीत शेखावत या विद्यार्थ्यांनी ‘टू बी इंटरप्यूनर’ या विषयातील ‘इलेक्ट्रीकल व्हेएकल चार्जिंग’ या तंत्राचे सादरीकरण केले. या सादरीकरणाला या ठिकाणी सर्वद्वितीय पारितोषिक पटकावले. या तंत्राच्या सादरीकरणासाठी या विद्यार्थ्यांना प्रा. बालाजी सूर्यवंशी, प्रा. जाकोब पटोले, प्रा. जगदीश कायत या प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले होते. या यशाबददल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. के. बिरादार यांनी या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात विशेष सत्कार केला. या विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापकांचे डॉ. अरूण खैरे, कल्याण देवकते, बाबासाहेब बनसोड, नंदकिशोर नाईकवाडे, सय्यद नजाकत, अनिल सपकाळ आदींनी अभिनंदन केले.

Previous articleकेवायसी करिता शेतकऱ्यांची सेवाकेंद्राकडून होणारी लूट थांबवा
Next articleमरण पत्कारू परंतु छावणी मध्ये जाणार नाही , “संविधान वाचवण्या साठी लोकशाही मार्गाने सरकारशी लढा देऊ”
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here