Home मराठवाडा केवायसी करिता शेतकऱ्यांची सेवाकेंद्राकडून होणारी लूट थांबवा

केवायसी करिता शेतकऱ्यांची सेवाकेंद्राकडून होणारी लूट थांबवा

54
0

परतुर शिवसेनेची मागणी….

परतुर – लक्ष्मीकांत राऊत

जालना , दि. ०४ :- महात्मा फुले कृषी कर्ज माफी साठी शेतकऱ्यांना केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे, सेतू सुविधा केंद्र व इतर इसेवा केंद्राकडून यासाठी 100 ते 200 रुपये घेतले जात असल्याने शेतकरी वैतागले आहेत, त्यामुळे शेतकऱ्याची होणारी ही लूट थांबवावी अशी मागणी परतुर तालुका शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
परतुर व तालुक्यातील इतर सेतुसुविधा केंद्र,आपले सरकार केंद्र तसेच केवायसी करणारे इतर केंद्रामार्फत कर्ज माफी साठी केवायसी करावी लागते,त्यानंतर कर्जमाफी होते, सध्या केवायसी करण्यासाठी अशा केंद्रावर शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत. याचा गैरफायदा घेत केंद्रचालक शेतकऱ्यांकडून 100 ते 200 रुपये घेत आहेत जे की सरळ सरळ लूट चाललेली आहे, सरकार कडून प्रति केवायसी 12 रुपये केंद्रचालकाना मिळत असतांना शेतकरी वर्गाकडून चालक अधिकचे पैसे उकळून लूट करत असल्याचे शिवसेनेने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे. शेतकऱ्यांची ही लूट त्वरित थांबवावी व लूट करणाऱ्या केंद्रावर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावर तालुकाप्रमुख अशोकराव आघाव,परतुर शहर प्रमुख दत्ता सुरुंग,अप्पासाहेब कदम,लक्ष्मीकांत कवडी,रामचंद्र काळे,दीपक हिवाळे, अहमद चाऊस,बापू घटमाळ यांच्या स्वाक्षऱ्या आहेत,निवेदनाची प्रत तहसीलदार रूपा चित्रक यांना देण्यात आली.