Home विदर्भ अखेर वादग्रस्त तलाठी पी एम वाकपांजर यांच्यावर निलंबनाची कारवाई,उपविभागिय अधिकारी यांचा आदेश

अखेर वादग्रस्त तलाठी पी एम वाकपांजर यांच्यावर निलंबनाची कारवाई,उपविभागिय अधिकारी यांचा आदेश

163

देवानंद खिरकर – अकोट

अकोला – शासकीय दाखल्यासाठी पैश्याची मागणी केल्याच्या आरोपाखाली वादाच्या भोवर्यात सापडलेले तलाठी पी.एम.वाकपांजर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दोन्ही तलाठी एम.एन.अढाऊ व पी.एम.वाकपांजर हे दाखल्या करीता शेतकर्या कडुन लाच घेत असल्याचा आरोप प्रहार संघटनेचे कार्यकर्त्यांनि केला होता.सोशल मीडियावर व्हिडिओ सुध्दा व्हायरल झाले होते.याप्रकरणी तहसीलदारांनि एक वेतनवाढ रोखण्याची आणि बदलीची कारवाई केली होती.परंतू दुसरीकडे अढाऊ या तलाठ्यांचे मंडळ अधिकारी पदावर पदोन्नती झाले त्यामुळे आचर्य व्यक्त केले होते.परंतू एक वेतनवाढ रोखण्यावर समाधानी नसल्याने सदर युवकांनी अकोला पालकमंत्री बच्चूकडू यांचेकडे दाद मागितल्या नंतर प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांना पाठवीला होता.तहसीलदार यांचा प्रस्ताव आणि तक्रारदार रवि मधुकर घुगंड,उमेश कानतोडे,विठ्ठल रामभाऊ केदार,दिलीप विश्राम तायडे,यांच्या लेखी बयानांच्या आधारावर तसेच व्हिडीओ मधे पैसे परत करतांना स्पस्टपणे निर्दशनास येत असल्यामुळे शासकीय कामात अशोभनीय वर्तन केल्याचा ठपका ठेवत वादग्रस्त तलाठी पी.एम.वाकपांजर यांच्यावर उपविभागीय अधिकारी रामदास सिध्दभट्टी यांनी निलंबनाची कारवाई केली.तलाठी वाकपांजर यांच्यावर निलंबनाची ही दुसरी कारवाई असल्याचे समजते.बोर्डी,अकोली जहागिर,हिवरखेड या तिन्ही गावामधे वाकपांजर हे वादग्रस्त तलाठी ठरले आहे.या कडे वरिस्ठ अधिकारी यांनी गांभिर्याने लक्ष देने गरजेचे आहे.तर दुसरे तलाठी एम.एन.अढाऊ यांच्या विरुध्द निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी अकोला यांचेकडे पाठविण्यात आला आहे.