Home महत्वाची बातमी महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या यादीत देवळी तालुक्यातील ५८५२ शेतकंर्याना दोन लाखापर्यंत...

महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या यादीत देवळी तालुक्यातील ५८५२ शेतकंर्याना दोन लाखापर्यंत कर्जमाफ.!

105

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

आधार प्रमाणिकरणास प्रारंभ शेतकऱ्यांमध्ये समाधान.

वर्धा – सततच्या दुष्काळाने कर्जाच्या ओझ्याखाली असलेला बळीराजाला बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेची घोषणा करण्यात आली.
त्यानुसार सदर योजनेच्या अंमलबजावणी साठी सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेच्या दुसऱ्या यादीमध्ये वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील ५८५२ शेतकऱ्यांचा समावेश आहे. सदर शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले पाहिजे यासाठी देवळीचे तहसीलदार राजेश सरवदे यांनी सारिका कारोटकर यांच्या देवळी येथील महा-ई-सेवा केंद्रावर आधार प्रमाणीकरण व सदर शेतकऱ्यांस मान्य असल्यास बोटाचा ठसा घेऊन आधार प्रमाणीकरण झाल्याची पावती तहसीलदार राजेश सरवदे यांच्या हस्ते नांदोरा (डफरे) येथील शेतकरी श्री गोपाल कृष्णाजी शेंडे व भिडी येथील शेतकरी राजेंद्र गावंडे यांना प्रमाणित आधार प्रमाणित झाल्याची पावती देण्यात आली. त्याच प्रमाणे बँक ऑफ इंडिया येथे महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्तीचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घेण्यासाठी शिबिर घेण्यात आले होते.
कर्जमुक्ती शिबिरात तहसीलदार राजेश सरवदे यांनी कर्जमुक्तीच्या संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच ग्रामपंचायत भिडी येथे सुध्दा शेतकरी व सरपंच सचिन बीरे यांना कर्जमुक्ती बद्दल गावकऱ्यांना दवंडी द्वारे करावे अशा सूचना देण्यात आल्या. या प्रसंगी बँक ऑफ इंडिया चे उपशाखा प्रबंधक मडावी, पटवारी पिंपळे, कोतवाल मयूर गावंडे, शेतकरी दिलीप झाडे, रावबाजी करवते, जयंत डफरे, चिंतामण मानकर, मनोज गावंडे, सचिन गवळी, भाजपा चे शहर अध्यक्ष रवि कारोटकर आदींची उपस्थिती होती.