Home महत्वाची बातमी शिक्षणाधिकारी कुंडगीर यांची तडकाफडकी बीड येथे बदली बदली

शिक्षणाधिकारी कुंडगीर यांची तडकाफडकी बीड येथे बदली बदली

69
0

नांदेड , दि. ४ ; ( राजेश भांगे ) ;-
जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब रामराव कुंडगीर यांची आज तडकाफडकी बदली करण्यात आली .बदलीचे आदेश आज दुपारी जिल्हा परिषदेत धडकले.
नांदेड जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी म्हणून बाळासाहेब रामराव कुंडगिर यांची नियुक्ती करण्यात आली होती. कुंडगिर यांच्या कार्यकाळात माध्यमिक शिक्षण विभागाची फारशी प्रगती झाली नसल्याचा ठपका अनेक लोकप्रतिनिधींकडून ठेवण्यात आला होता. त्यातच आज दिनांक ४ मार्च रोजी शिक्षणाधिकारी बाळासाहेब रामराव कुंडगीर यांची बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी पदी बदली करण्यात आली आहे. बदली रद्द करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अर्ज सादर करू नये तसे आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल . शिवाय बदलीचे आदेश प्राप्त होताच तात्काळ बदली झालेल्या ठिकाणी रुजू व्हावे असे आदेशही देण्यात आले आहेत.