Home मुंबई आई बाबा अन चिमुकली मुलगी तिघानीही केली आत्महत्या..!

आई बाबा अन चिमुकली मुलगी तिघानीही केली आत्महत्या..!

216
0

घरातील लोकांच्या जाचाला कंटाळून केली आत्महत्या….!!

अमीन शाह

डोंबिवली , दि. ०२ :- कल्याण ग्रामीणमधील वाकलण गावात आज सकाळी अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. आमच्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी आत्महत्या करत आहोत, आमच्या आत्महत्येला आमच्या कुटुंबीयांना जबाबदार धरावे, अशी चिठ्ठी लिहून नंतर ही चिठ्ठी व्हॉट्सअॅपवरून कुटुंबीयांना पाठवून पती, पत्नी आणि मुलगी अशा एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली. या घटनेमुळे कल्याण ग्रामीण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आज पहाटे ५ वाजता शिळडायघर येथील वाकलण गावात ही घटना घडली. शिवराम पाटील, त्यांची पत्नी दीपिका पाटील (वय ३५) आणि मुलगी अनुष्का पाटील (वय ३) अशी मृतांची नावं आहेत. पाटील कुटुंबाने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली होती. त्यात त्यांनी त्यांच्या आत्महत्येला कुटुंबाला जबाबदार धरले आहे. ‘कुटुंबातील इतर लोकांना त्रास देण्यासाठी आम्ही आत्महत्या करत आहोत. आमच्या आत्महत्येस घरातील सगळ्या जणांना जबाबदार धरावं’, असा मजकूर या चिठ्ठीत लिहिल्यानंतर त्याचा फोटो काढून ही चिठ्ठी कुटुंबीयांना व्हॉट्सअॅपवरून त्यांनी पाठवली आणि त्यानंतर या तिघांनी गळफास लावून राहत्या घरी आत्महत्या केल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.
या चिठ्ठीत १३ जणांची नावं लिहिण्यात आली आहेत. हे सर्वजण आमच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याचं म्हटलं असून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, असं चिठ्ठीत नमूद करण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांना ही सुसाईड नोट ताब्यात घेतली असून सुसाईड नोटमध्ये नावं असलेल्या १३ जणांची चौकशी करण्यात येणार आहे. त्याशिवाय शेजाऱ्यांचीही चौकशी करण्यात येणार असून या आत्महत्येमागचं नेमकं कारण उलगडण्यात येणार असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.
आम्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले असून अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. आमचं एक पथक या प्रकरणाचा तपास करून एफआयआर दाखल करून घेईल, असं पोलीस उपायुक्त एस. बुरसे यांनी सांगितलं.
बायकोचे दागिने दान करा , या सुसाइड नोटमध्ये पाटील यांनी आमच्या आत्महत्येनंतर पत्नी दीपिकाचे सर्व दागिने दान करण्यात यावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे. तसेच संपत्तीच्या वादातून आम्ही आत्महत्या करत आहोत, असंही या चिठ्ठीत नमूद करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. या जोडप्याने आधी मुलीची हत्या केली. त्यानंतर त्यांनी गळफास लावून स्वत:ला संपवल्याचं पोलीस सूत्रांनी स्पष्ट केलं.

Previous articleL I C चा गलथान कारभार चूक नसतांना ग्राहकाला आर्थिक भुर्दंड
Next articleनुकसानग्रस्त पिकांचे , भेटि देवुन तत्त्काळ पंचनामे करावेत – खा.चिखलिकरांची अधिकाऱ्यांना सुचना
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here