Home मराठवाडा नुकसानग्रस्त पिकांचे , भेटि देवुन तत्त्काळ पंचनामे करावेत – खा.चिखलिकरांची अधिकाऱ्यांना सुचना

नुकसानग्रस्त पिकांचे , भेटि देवुन तत्त्काळ पंचनामे करावेत – खा.चिखलिकरांची अधिकाऱ्यांना सुचना

286

नांदेड , दि.२ ; ( राजेश भांगे ) –
नांदेड जिल्ह्यातील नायगांव , लोहा , मुदखेड तालुक्यासह जिल्ह्यातील इतर तालुक्यातील गावात हि काल व परवा अनेक ठिकाणी वादळी वाय्रासह अवकाळी पाऊसाचा तडाखा शेतकऱ्यांना बसला. त्यात शेतकऱ्यांचे गहु , हरभरा , सुर्यफुल आदि रब्बी पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. आवकाळी वादळी पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडला असुन शेतकऱ्यांन वर दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालीआहे.
अचानक ऊद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तिजनक परिस्थिती मुळे शेतकरी हतबल झाला आहे .
आगोदरच आडचणीत असलेला शेतकरी या आवकाळी पावसा मुळे आधिकच चिंतातुर झाला आहे. शेतकऱ्यांना झालेल्या या नैसर्गिक आपत्ती जनक संकटातुन बाहेर काढण्याची व त्यांना दिलासा देण्याची गरज आहे . त्यामुळे संबधित तालुक्यातील प्रशासनाने सर्व नुकसानग्रस्त शेतात जावुन शेती नुकसानीचे सर्वे करून त्त्काळ पंचनामे करावे जेने करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करणे शक्य होईल. तरी संबधित तालुका प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतींचे तत्काळ पंचनामे करावे. अशी सुचना नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटिल चिखलिकर यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.