जळगाव

जळगाव जिल्ह्यातील पहिली शालेय रोबोटिक लॅब गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल पाचोरा

Advertisements

निखिल मोर

पाचोरा , दि. ०२ :- राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधुन गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल पाचोरा येथे डॉ. भुषण मगर यांच्या अध्यक्षतेखाली रोबोटिक लॅब व विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. विज्ञान प्रदर्शनात इ. ७ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांनी विज्ञानावर आधारित अनेक प्रकल्प बनवले व सादर केले. तसेच आजच्या कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण राहिले ते म्हणजे शालेय स्तरावर जळगाव जिल्ह्यातील पहिली रोबोटिक लॅब. इ.६ वी च्या विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी विविध प्रकारचे रोबोट बनवून भेट देणाऱ्यांना आश्चर्यचकित केले. या रोबोटिक लॅबला लिटिल सायंटिस्ट असे नाव देण्यात आले. कार्यक्रमाला विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. भुषण मगर, बल्लाळेश्वर फाऊंडेशनचे संचालक हरिभाऊ पाटील, चंदनाणी क्लिनिक चे संचालक मनीष चंदनाणी, नगरसेवक बापु हटकर, राम केसवाणी, सतीश शामनाणी, सुनील शामनाणी, सद्गुरु मेडिकलचे संचालक वरंदलाल पुर्सनाणी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना वाणी, अमीना बोहरा यांनी केले. रोबोटीकचे विशेषज्ञ चेतन सोनवणे व अंकुश शामनाणी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे उद्घाटन व दिप प्रज्वलन करून तसेच रिबन (फीत) कापून व चंद्रायन-२ चे मॉडेल संचलित करून करण्यात आले. शाळेचे प्राचार्य प्रेम शामनाणी व उपस्थित मान्यवरांनी या लिटल सायंटिस्टला भावी पिढीतील नक्कीच मोठे शास्त्रज्ञ व्हावे अशा शुभेच्छा दिल्या.

You may also like

जळगाव

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांनी केली जम्बो कार्यकारिणी जाहीर… आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप…

अमळनेर  –  येथील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना शैक्षणिक अडचणी सोडवण्यासाठी आमदार अनिल ...
जळगाव

ज्येष्ठ नागरिक संघाच्या बहुउद्देशिय सभागृहाचे भूमिपूजन संपन्न

रावेर (शरीफ शेख) जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या संकल्पित बहुउद्देशिय सभागृहाच्या ...
जळगाव

आरटीई नुसार झालेल्या प्रवेशप्रक्रियेच्या चौकशीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

वावडदा येथील पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले निवेदन रावेर (शरीफ शेख) जळगाव जिल्ह्यातील वावडदा येथील एल.एच.पाटील इंग्लिश ...