Home विदर्भ सेलू तालुक्यातील तुळजापूर परिसरात मेघगर्जनेसह पाऊस.!

सेलू तालुक्यातील तुळजापूर परिसरात मेघगर्जनेसह पाऊस.!

208
0

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

बळीराजा धास्तावला.

वर्धा , दि. ०२ :- जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील तुळजापूर( वघाळा) येथिल परिसरात हरभरा सवंगनी.तूर काढनी .कापासी वेचनी. हंगाम या वेळेस जोमाने सुरू असून सोमवार दि.२ रोजी ब्राह्ममूहर्तावर मेघगर्जनेसह पावसाने जोरदार स्वरुपात सुरूवात केली.

साधारणताह एक तास पाऊस पडून शेती पिकाची नूकसान केली.असमानी सुलतानी संकटाचा सपाटा यंदा असाच राहनार काय – असा सवालपरिसरात बळिराजा करित असून कपाशी. हरभरा.तुरी. ऊस.भाजीपाला अन्य शेती पिक राम भरोशे शेतित पडून असून शेतकरी हरभरा कुटिरोद्योग जनावरांना अन्न चारा नेन्यात व्यस्त आहे.पहिलेच मजूराची कमि.वरून कपाशी वेचनी हरभरा सवंगनी .चन्याचे खांड रितसर लावून वाळवने .अशातच मेघगर्जनेसह पावूसाचा तडाखा .यामुळे वघाळा.तुळजापूर.टाकळी (किटे)खरांगना (गोडे)कुटकी तळोदी.जयपूर. सुकळी सेलू रोड परिसरात बळीराजा धास्ताहून गेला आहे.करावे तरी काय असमानी सुलतानी संकटाचा सामना करता करता शेतकरी मेटाकूटीस आला आहे.हरभरा.तुरी. उतारी जेमतेमच असून सवंगनी नंतर ढिग पसरवून वाळविन्यासाठी संपूर्ण शेतातच मनमोकळा पसर होता. अशातच शेतकऱ्यांना मेघगर्जनेसह पावसाचा तडाखा बसला. हरभरा काढल्या नंतर वाळविन्यासाठी अंगनात ढिग होता. काहि ओलावा लागला.काहि शेतकऱ्यांना कसरत करून सुरक्षित ठिकाणी लपवावा लागला.चनान्याचे कुटार ओले झाले.बेचव कुटार जनिवरे खान्यास चवन्या करतात ते एक वेगळेच समीकरन.तुरीचे खांड कुनाचे ओले झाले.तर कुनाचे पुन्हा रात्री पाऊस येनार तर नाहि ना मनून झाकने सुरु आहे.शेत मजूर हरभऱ्याची घाटया वेचन्यात व्यस्त असून मोजक्या घाटि शिल्लक राहिली ते मेहनतीने एक एक वेचनी सुरु आहे. शासन स्तरावर फुल नाहि फुलाची पाकळी मदत मिळेल काय.असा सवाल शेतकरी करीत आहे.