Home रायगड कर्जत कोकण ज्ञानपीठ विद्यालयात शिकणाऱ्या 22 वर्षाचा विद्यार्थ्यांचा क्रिक्रेट खेळतांना दुर्दैवी मृत्यू

कर्जत कोकण ज्ञानपीठ विद्यालयात शिकणाऱ्या 22 वर्षाचा विद्यार्थ्यांचा क्रिक्रेट खेळतांना दुर्दैवी मृत्यू

34
0

जयेश जाधव

कर्जत शहरातील कोकण ज्ञानपीठ विद्यालयात शिकणाऱ्या 22 वर्षाचा विद्यार्थी रंजित रामभवन पाल रा . कुर्ला याचा क्रिक्रेट खेळतांना आज सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
कोकण ज्ञानपीठ विद्यालयात रंजीत इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्यूनिकेशनच्या शेवटच्या वर्षांला शिकत होता सद्या विद्यालयात स्पोर्टस सुरु आहेत. बॉक्स क्रिक्रेट मध्ये रंजित खेळत होता. खेळता खेळता अचानक त्याला थकवा आला आणि तो खाली बसला आणि तेथेच पडला. ताबडतोब प्राचार्य मधुकर लेकरे आणि विकास पाटील यांनी त्याला उचलून शुभम हॉस्पिटल मध्ये नेले. त्याची प्रकृती नाजूक असल्यामुळे त्याला कर्जत उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयाचे डॉक्टर नितीन चव्हाण यांनी रणजित पाल याची शारीरिक तपासणी केली असता तो मृत असल्याचे प्राचार्यांना सांगितले. रंजित याच्या अचानक निधन पावल्याने त्याच्या कुटुंबियांवर आणि मित्रांवर दुःखाचा डोंगर कोसळला .

Unlimited Reseller Hosting