८ महिने अगोदर दिलेला धनादेश कोणतेही कारण न देता २७ फेब्रुवारी रोजी दिले परत
वरिष्ठांकडे केली ऑनलाइन तक्रार
रवि आण्णा जाधव – देऊळगावराजा
८ महिने अगोदर दिलेला धनादेश कोणतेही कारण न देता २७ फेब्रुवारी रोजी दिले परत करून ग्राहकांना चुकीची वागणूक दिले. LIC चे गलथान कारभार चूक नसतांना ग्राहकाला आर्थिक भुर्दंड बसत असल्याचे प्रकार देऊळगाव रााज LIC कार्यलयात घडला. ग्राहकांनी वरिष्ठांकडे केली ऑन लाइन तक्रार.
शहरातील रहिवासी व सध्य स्थितीत बँक ऑफ इंडिया शाखा वणी येथे अधिकारी पदावर कार्यरत रोहन जैन यांनी २००५ मध्ये LIC ची पॉलिसी काढली होती व त्याचे हप्ते नियमित धनादेश द्वारे भरणा करीत असे जून २०१९ मधील हप्ता २२ जून रोजी बँक ऑफ इंडिया चा शाखा देऊळगाव राजा चा धनादेश क्रमांक ०१२४१५०, रक्कम- ३१५३ रुपयांचे LIC ऑफ इंडिया नावाने अकाउंट पे देण्यात आला त्याची त्याच दिवशी पावती LIC ने तयार करून दिली व तब्बल ८ महिन्यानंतर दि. २७ फेब्रुवारी रोजी त्या ग्राहकास पत्र देऊन तुम्ही दिलेला धनादेश बँकेतून न वटवता परत आल्याचे कळून लेट फी ची मागणी केली मात्र धनादेश कोणत्या कारणामुळे परत आला याबाबत कोणत्याही बँकेचे मेमो लेटर त्यांनी ग्राहकास दिले नसून त्यांच्या या गलथान कारभारामुळे ग्राहकास कोणतीही चूक नसतांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला याबाबत ग्राहकाने LIC च्या वरिष्ठांना तक्रार दिली असून संबंधित दोषी विरुद्ध कार्यवाही ची मागणी केली आहे. तर याच कार्यालयात कार्यरत रोखपाल यांनी ग्राहकांचे समाधान करण्याऐवजी त्याच ग्राहकास धमकी देत पोलीसांच्या ताब्यात देण्यासाठी अर्वाच्य भाषेत संभाषण केले, वरिष्ठांनी याबाबत सविस्तर माहिती घेऊन दोषी विरुद्ध कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे.
