Home मराठवाडा एकाच दिवशी दोन टलाल विमा धारकाच्या परिवाराला डाक विभागाचा आधार – सुरेश...

एकाच दिवशी दोन टलाल विमा धारकाच्या परिवाराला डाक विभागाचा आधार – सुरेश सिंगेवार

27
0

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

नांदेड / बोधडी दिनांक २८ रोजी मु.पो.थारा येथील रहिवासी आनंद विठ्ठल गोपगीनवार यांनी पोस्ट ऑफिस ची ग्रामीण डाक जीवन विमा एक लाखाचा उघडला होता.त्या विम्याचे हाप्ते ते निमित्तपणे भरत होते.

अचानक आनंद विठ्ठल गोपगीनवार यांचा मृत्यू झाल्याने यांची कागदपत्रे डाक अधीक्षक नांदेड येथे पाठवण्यात आले होते. डाक अधीक्षक शिवशंकर बी लिंगायत यांनी ताबडतोब किनवट येथील डाक निरीक्षक यांना पूर्ण डाक विमा अधिक बोनससह रक्कम देण्याचे आदेश दिले.
दि.२८ रोजी डाक निरीक्षक किनवट आभिनव सिन्हा यांनी ग्रामीण डाक जीवन विमा वारसाची आई कुसुमबाई विठ्ठल गोपगीनवार यांना रुपये १६६८१२/अक्षरी एक लाख,सहाशष्ट हजार,आठशे,बारा रुपये डाक निरीक्षक यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला.
तर मु.पो.रिठा येथील रहिवासी व पोस्ट कर्मचारी जयवंत गोमा आडे यांनी डाक जीवन विमा रुपये पन्नस हजार चा काढला होता त्यांनी पण डाक विम्याचा हप्ता नेमितपणे भरत होते.त्यांचा पण मृत्यू झाल्याने त्याचे वारस त्यांची पत्नी श्रीमती फुलाबाई जयवंत आडे यांना डाक निरीक्षक किनवट आभिनव सिन्हा यांच्या हस्ते रुपये ८०१५०/अक्षरी अंशी हजार,एकशे,पन्नस रुपयेचा धनादेश देण्यात आला.
यावेळी बोधडी येथील पोस्ट मास्तर विलास श्रीमनवार व नांदेडचे डाक विभागाचे मार्केटिंग एक्सिकेटीव्ह सुरेश सिंगेवार व कर्मचारी उपस्थित होते.
या वेळी नांदेडचे मार्केटिंग एक्सिकेटीव्ह सुरेश सिंगेवार म्हणाले की ग्रामीण डाक जीवन विमा ही प्रत्येक नागरिकांनाच्या काळाची गरज आहे.हप्ता कमी व मिळणारी रक्कम जास्त आहे. इतर कंपन्या ग्रामीण भागात येतात मोठया रक्कमेची आमिष दाखवून ग्रामीण भागातील नागरिकांना फसवणूक करून जातात आशा विम्या कंपन्यावर जनतेनी विश्वास ठेवू नये. पोस्ट ऑफिस आपल्या गावात पिढ्यानपिढ्या पासून चालु आहे. पोस्ट हे केंद्र सरकारचे ऑफिस आहे, पोस्ट मध्ये पैसे जमा केल्यास जास्ती व्याज देऊन ग्रहांकाना पैसे दिले जातात.
नागरिकांनी जास्ती जास्त पैशाची गुंतवणूक पोस्ट ऑफिस मध्ये करून आपले व आपल्या मुला-मुलींचे स्वप्न साकार करावे असे मार्गदर्शन केले.

Unlimited Reseller Hosting