Home मराठवाडा एकाच दिवशी एकशे,सतावीस, ग्रामीण डाक जीवन विमा योजनेचे नागरिकांचे खाते उघडले –...

एकाच दिवशी एकशे,सतावीस, ग्रामीण डाक जीवन विमा योजनेचे नागरिकांचे खाते उघडले – सुरेश सिंगेवार

179

नांदेड / बोधडी , दि.२७ रोजी भारतीय डाक विभागाच्या वतीने ग्रामीण डाक जीवन विमा व डाक जीवन विमा योजनेचा महा लॉगीन दिवस मराठवाड्यात आयोजित करण्यात आला होता.त्या निमित्ताने सर्वच डाक कर्मचारी ग्रामीण भागात नागरिकांना विम्याची माहिती देऊन खाते उघडण्यात येत होते.
नांदेडचे मार्केटिंग एक्सिकेटीव्ह सुरेश सिंगेवार यांनी बोधडी तालुका किनवट या गावाची निवड केली व गावात व बाजारपेठ मध्ये जाऊन माहिती दिली. व दवंडी फ़िरवली आणि या योजनेची माहिती बोधडी पोस्ट ऑफिस मध्ये आलेल्या नागरिकाना ग्रामीण डाक जीवन विमा संबधी माहिती देण्यात येत होती.
बोधडी पोस्ट ऑफिस मध्ये विमा घेण्यासाठी यात्रेचे स्वरुप आले होते.
ग्रामीण डाक जीवन विमा घेतल्यास आपला विमा संरक्षण असतो ,पैशाची बचत होते, आणि मुदत पूर्ण झाल्याने मिळणारी रक्कम इतर योजने पेक्षा जास्तीची मिळत असते.असे सुरेश सिंगेवार यांनी मार्गदर्शन केले.
एकाच दिवसात ग्रामीण डाक जीवन विमा योजनेत १२७ नागरिकांनी एवढ्या मोठ्या संख्येने सहभागी होऊन भाग घेतल्याने नागरिकांना मोठा फायदा मिळणार आहे असे सिंगेवार यांनी सांगितले.

यावेळी डाक निरीक्षक किनवट आभिनव सिन्हा व बोधडी पोस्ट ऑफिस चे पोस्ट मास्तर विलास श्रीमनवार हे उपस्थित होते.
एकाच दिवसात ग्रामीण डिस्क जीवन विमा योजना खाते उघडल्याने सुरेश सिंगेवार याचे डाक निरीक्षक किनवट व पोस्ट मास्तर बोधडी यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले तर डाक अधीक्षक शिवशंकर बी लिंगायत यानो फोन करून अभिनंदन केले आहे.