Home विदर्भ नामदार सुनील केदार यांचा कारंजा नगरीमध्ये सत्कार

नामदार सुनील केदार यांचा कारंजा नगरीमध्ये सत्कार

57
0

प्रतिनिधी – कारंजा (लाड)

वाशिम , दि. ०१ :- महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री नामदार सुनील केदार यांचा कारंजा नगरमध्ये काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, काँग्रेस नेते हाजी मो.युसूफ सेठ पुंजानी, नगराध्यक्ष शेषराव ढोके तसेच कारंजा नगर पालिकेचे गटनेता, सभापती तसेच नगरसेवकांच्या हस्ते दि.२९ फेब्रुवारी रोजी सत्कार करण्यात आले.
भाजप प्रणित केंद्र सरकारच्या एस सी,एस टी, ओबीसी तसेच अल्पसंख्याक आरक्षण नीतीच्या विरोधात वाशिम येथे एकदिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या धरणे आंदोलनामध्ये नामदार सुनील केदार,माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, नामदार यशोमती ठाकूर,आमदार अमित झनक,काँग्रेस नेते मो.युसूफ पुंजानी हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.या कार्यक्रमानिमित्त नामदार सुनील केदार हे कारंजा मार्गे जात असतांना स्थानिक रिलायन्स पेट्रोल पंम्पाजवळ त्यांचा कारंजा नगरीमध्ये स्वागत तसेच सत्कार करण्यात आला. या वेळी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, काँग्रेस नेते मो.युसूफ पुंजानी,नगराध्यक्ष शेषराव ढोके, गटनेते फिरोज शेकूवाले,सभापती सलीम गारवे, झाकीर शेख,सलीम प्यारेवाले, राजू इंगोले, स्थायी समिती सदस्य निसार खान,नगरसेवक सैय्यद मुजाहिद, अ. एजाज अ.मन्नान,युनूस पहेलवान,रशीद भाई,आरिफ मौलाना आदींची उपस्थिती होती.