
सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार
संथगतीने सुरु असलेल्या सेलडोह-सिंदी रस्ता ठरतोय जीवघेणा.
वर्धा , – जिल्ह्यातील सिदी रेल्वे येथे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने येथील नगर पालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासकीय अधिकारी सुनील घोडे हे गंभीर जखमी झाल्याची घटना २८फेबु. रोजी रात्री ९:३० दरम्यान सेलडोह – सिंदी मार्गवर घडली.
गंभीर जखमी असलेल्या श्री घोडे यांना रात्री सेवाग्राम रुग्णालयात भरती करण्यात आले होते .
मात्र पहाटे त्यांना नागपुर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
मागील दिड वर्षापासून सेलडोह-सिंदी रस्ता रुंदीकरण आणि सिमेंटीकरनाचे काम कासवगतीने सूरु असून कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे जागोजागी रस्ता उखडून पडला आहे तर बाधकाम साहित्य मुरुम वगैरे पडुन असल्याने वाहन चालकाना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागते. यात विशेष म्हणजे रस्त्याने मोठे वाहन गेले म्हणजे धुळच-धुळ उडत असतो यामुळे मागुन येणाऱ्या लहान मोठ्या वाहनांना समोरचा रस्ताच दिसत नाही. शिवाय रस्ता एकाच बाजूने वाहतूकीस सुरू असल्याने अडचन होते. रस्त्यावर रिप्लेक्टर वगैरे नसल्याने नवीन येणाऱ्याला अंदाजच येत नाही.
पालिका कर्मचारी सुनिल घोडे नागपूर येथे बजेटची बैठक आटपुन गावाला परत येत होते ते सेलडोह पर्यत ट्रॅव्हल्सने आले तेथुन स्वतःच्या मोटरसायकल सीडीडॉन गाडी क्रमांक एम एच ३२ एल ७१७६ ने परत येतांना सेलडोह-सिंदी रस्त्यावर श्री सुरकार यांच्या शेताजवळ मोठ्या वाहनामुळे उडालेल्या धुळीमुळे जाणार्या परस्पर विरोधी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने घोडे गंभीर जखमी होवुन पडुन राहले शहरात माहीती होताच शहरातुन जाऊन त्यांना लागलीच अॅबुलन्सने भरती करण्यात आले मात्र त्यांना पहाटे तेथुन नागपुर येथे हलविण्यात आल्याचे कळते.
सिंदी पोलिसात सदर गुन्हाची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास ठाणेदार प्रशांत काळे करीत आहे.










































