Home मराठवाडा राखीव दलाच्या वर्धापन दिना निमित्त सायकल रैली चे आयोजन….!

राखीव दलाच्या वर्धापन दिना निमित्त सायकल रैली चे आयोजन….!

103

अब्दुल कय्युम

औरंगाबाद , दि. ०१ :- राज्य राखीव पोलीस बलाच्या 71 व्या वर्धापन दीना निमित्त श्रीमती अर्चना त्यागी अप्पर पोलीस महासंचालक राज्य राखीव पोलीस बल यांच्या संकल्पनेतून दर वर्षी 25 फरवरी ते 6 मार्च पर्यंत नागपूर ते पुणे अशी सायकल रैली काढण्यात येते काढण्यात आलेल्या रैली व्दारे बेटी बचाव , बेटी पढाओ , जय जवान जय किसान इत्यादी जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातात आज ही रैली येथील कैम्ब्रिज शाळेत आली असता येथे समदेशक सुरेश माटे यांनी स्वागत केले निघालेल्या रैली मध्ये 120 राज्य राखीव पोलीस बल अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग घेतला असून या रैली चे नेतृत्व पोलीस उप निरिक्षक एस बी काकडे हे करीत आहे तसेच नागपूर येथील विद्यार्थ्यांनी आपत्ती वयस्थापन प्रात्यक्षिक करून दाखविले रैली च्या यशस्वीते साठी मा , समदेशक माटे , अंभोरे , आर , आर वाघ , सह समादेशक आय एस शेख , पोलीस उप निरीक्षक ऐल ,ऐस सपकाळ , बी, जी अंभोरे , वि के राऊत इत्यादींनी यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले .