Home मराठवाडा संविधानाचे रक्षकच बनले भक्षक कुठलाही गुन्हा दाखल नसताना शिवाजीनगर पोलिस स्टेशनला बोलावून...

संविधानाचे रक्षकच बनले भक्षक कुठलाही गुन्हा दाखल नसताना शिवाजीनगर पोलिस स्टेशनला बोलावून ब्रदर आदी बनसोडे यांना अविनाश फस्के यांनी गलीच्छ भाषेत शिवीगाळ करून मारहाण

120
0

खाजगी रुग्णालयात सामाजिक कार्यकर्ते म्हणून यापुढे कोणत्याही रुग्णालयास भेट दिल्यास किंवा रुग्णालयाच्या परिसरात दिसल्यास जिवंत राहणार नाहीस अशी धमकी देणारे शहर पोलीस उप-अधीक्षक अभिजीत फस्के यांची चौकशी करून कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी , अन्यथा आत्मदहन करणार- आदी बनसोडे

नांदेड , दि. ०१ :- गोरगरीब व आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांसाठी गेल्या तीन वर्षापासून मदत करीत असतो व रुग्णांना सेवा देत असतो दि. २३/०२/२०२० रोजी संजीवनी हॉस्पिटल येथे आम्हाला मरण पावलेल्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तिथे जाऊन मृत रुग्णाची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असल्यामुळे उर्वरित पैसे नाहीत म्हणून आम्ही डॉक्टरांना विनंती केली होती की डॉक्टर साहेब रुग्णाला काहीतरी मदत करा याअगोदर रुग्णाच्या नातेवाईकांनी एक लाख रुपये खर्च केलेला आहे तरी आता त्यांच्याकडे पैसे नाहीत डॉक्टरांना विनंती करून सुद्धा डॉक्टर म्हणाले की पूर्ण पैसे भेटल्या शिवाय आम्ही डेड बॉडी देत नाही त्यावेळी आम्ही भावणीक होऊन कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती व नांदेड शहरातील खाजगी हाॅस्पिटल मध्ये बोगस स्टाॅफचा काळा बाजार बंद करा म्हणून आवाज उठवले होते, त्याचाच राग धरून सदरील संजीवनी दवाखान्याचे डॉक्टर कौटकर व इतर हाॅस्पिटलचे डॉक्टर यांनी आदी बनसोडे यांच्याविषयी खोट्या तक्रारी करुन मारहाण करण्यास सांगितले आहे… पोलिसांमध्ये तुमच्या विरोधात तक्रार केली आहे तुम्ही शिवाजीनगर पोलीस स्टेशनला या किरण सूर्यवंशी व आदी बनसोडे असे मिळून पोलीस स्टेशनला गेलो आम्ही तिथे गेल्या असता तुमच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करतो डॉक्टरला पैसे मागत आहात यापुढे जर डॉक्टर लाइन ला दिसलास की गेलास पंधरा दिवस पीसीआर करून तडीपार करतो असे धमकावून आम्हाला लाथाबुक्क्यांनी तोंडावर सुंदरीने मारहाण करण्यात आले व तुमच्या मायचा सालोहो, लई रुग्णसेवा समाजसेवा कार्यकर्ता होऊ वाटालय असं घान घान शिव्या दिले आहे,
सदरील घटना ही लोकशाहीला काळिमा फासणारे असून तरी सदरील प्रकरणाची योग्य ती चौकशी करून संजीवनी हॉस्पिटल ऱ्हदय स्पेशालिस्ट आहे तरी सर्पदंशाच्या रुगणांचा इलाज होत नसताना देखील रुग्णांकडून पैसे काढण्यासाठीच डॉक्टरांनी त्याला ऍडमिट करून घेतले व त्यांच्या हलगर्जीपणामुळे योग्य उपचार झाला नसल्यामुळे रुग्ण स्वतः दगावला गेला आहे व आदी बनसोडे यांनी आतापर्यंत गरीब रुग्णांसाठी अनेक हॉस्पिटल मध्ये जावून सरकारी योजनेमध्ये पेशंटला माहिती देणे डॉक्टरांचे समजून साधून त्यांना मदत करणे व नर्सेसच्या अन्याय-अत्याचार विरुद्ध आवाज उठवणे रूग्णाच्या हक्क-अधिकार यासाठी आवाज उठवणे असे अनेक वर्षापासून आदी बनसोडे यांनी कार्य करत आहेत तरीही हॉस्पिटलचा काळाबाजार जो चालला आहे तो उघड होत असल्यामुळे डॉक्टरांनी मिळवून पोलिसांच्या हस्ते त्यांच्या वर मारहाण करण्यास सांगितले आहे…
सदरील घटनेची चौकशी करून आम्हाला न्याय देण्यात यावा जर न्याय मिळाला नसल्यास आम्ही मंत्रालयाच्या परिसरात येऊन आत्मदहन करणार आहोत याची जबाबदारी राहिल…

निवेदनावर मा.आदी बनसोडे व किरण सुर्यवंशी यांच्या सह्या आहेत…

Unlimited Reseller Hosting