Home बुलडाणा “सावित्री सृष्टी” च्या या चळवळीत मी तुमच्या सोबत – रुपाली चाकणकर

“सावित्री सृष्टी” च्या या चळवळीत मी तुमच्या सोबत – रुपाली चाकणकर

74
0

सावित्री माई फुले स्मृतिज्योत समिती ने घेतली भेट

जाकीर शेख – सिंदखेडराजा

राष्ट्रवादीच्या प्रदेश अध्यक्षा सौ रुपाली ताई चाकणकर यांची औरंगाबाद येथे स्मृतिज्योत नियोजन ची माहिती आणि उद्देश सांगितला तसेच कार्यक्रम ची रूपरेषा सांगितली,आणि नायगाव ला येण्याचे आमंत्रण दिले त्यांच्या सोबत राष्ट्रवादी च्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान पण होत्या त्या वेळी स्मृतिज्योत च्या अल्बम अनावरण प्रसंगी स्मृतिज्योत समिती चे संकल्पक दिपक ठाकरे, माळी कर्मचारी महासंघ चे नंदकिशोर खरात सर, संजय ठाकरे सर, आकाश मेहत्रे

8 मार्च जागतिक महिला दिनाचे निमित्त साधत मा जिजाऊ च्या माहेरवरून(सिंदखेड राजा बुलढाणा जिल्हा) 10 मार्च मा सावित्री च्या स्मृतिदिनी मा सावित्री च्या माहेरी (नायगाव ता खंडाळा, जी सातारा)येथे जात असते
सावित्री माई फुले यांचे कर्तृत्व,त्याग आणि कार्य ची जाणीव ठेवत सावित्रीमाई च्या जन्मगावी सावित्री सृष्टी झाली पाहिजे .

सावित्रीमाई फुले स्मृतिज्योत च्या संकल्पनेतून ही मागणी महाराष्ट्र भरातून होत होती, या मागणी ची दखल घेत 3 जानेवारी 2019 ला तत्कालीन मुख्यमंत्री मा देवेंद्र जी फडणवीस साहेब यांनी नायगाव ला सावित्री सुस्टी घोषित करत नायगाव ला ब दर्जा व पर्यटन स्थळ ही घोषित केले त्यामुळे महाराष्ट्र मध्ये आनंद च वातावरण तयार झाले व महाराष्ट्र मधील जनतेने आभार व्यक्त केले

सावित्री सुस्टी घोषित झाली तरी सावित्री सुस्टी प्रत्यक्षात उभी राहण्या साठी गरज आहे ती महाराष्ट्र भरातून लोकांनी नायगाव ला जमा होण्यासाठी त्या साठी च या स्मृतिज्योत चे आयोजन करण्यात येते,सावित्री माई फुले स्मृतिज्योत ही मान्यवरांच्या हस्ते मा जिजाऊ चें दर्शन घेऊन पेटवली जाते, प्रमुख मान्यवराचे मार्गदर्शन झाल्यानंतर ढोलपथका सह आदर्श शाळेतील व इतर शाळेतील विद्यार्थी नि मा जिजाऊ व मा सावित्री च्या वेषभूषेत गावातून भव्य मिरवूनक निघून देवळगाव राजा कडे प्रस्थान करत असते त्या नंतर जालना,चिकलठाणा औरंगाबाद ला 8 तारखेला मुक्काम व दुसऱ्या दिवशी
नेवासा, अहमदनगर, पुणे येथे मुक्काम व 10 तारखेला फुलेवाडा येथे पूजन करत नायगाव येथे 12 वाजेला नायगाव च्या वतीने सावित्री माई फुले स्मृतिज्योत चे स्वागत व पूजन करत मा सावित्रीना अभिवाद करत समारोप केला जातो ही स्मृतिज्योत 6 जिल्ह्यातून 450 किमी अंतर पार करत नायगाव ला पोहचते याची माहिती राष्ट्रवादी महिला प्रदेश अध्यक्ष रुपाली ताई चाकण कर व राष्ट्रवादी च्या महिला आघाडी च्या राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान यांना माहिती दिली, तसेच रुपाली ताई ने सांगितलं की जिजाऊ सावित्री ची लेक या नात्याने मी या चळवळीत नेहमी तुमच्या सोबत असेल आणि नेहमी हा प्रश्न वरती आवाज उचलेल…